Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड जान्हवी कपूर-अनन्या पांडेच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा ग्लॅमरस फोटो

जान्हवी कपूर-अनन्या पांडेच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा ग्लॅमरस फोटो

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ती नेहमीच तिचे नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिने इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. केवळ जान्हवीच नाही तर, अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Kapoor) देखील तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

दिल्लीत आयोजित पाच दिवसीय एफडीसीआय एक्स लॅक्मे ( FDCI x Lakme ) फॅशन वीकची सुरुवात चांगली झाली आणि शेवटही झाला. कोरोना महामारीनंतर ही पहिलीच वेळ होती जिथे बी-टाउन सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक करून स्टेजला थक्क केले. त्याचवेळी जान्हवी कपूर आणि अनन्याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या. दोन्हीही अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत होत्या. ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जान्हवीने जबरदस्त आऊटफिटमध्ये दिली किलर पोझ
या फोटोंमध्ये जान्हवी कपूरने परिधान केलेल्या ड्रेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सर्वजण तिच्या ड्रेसचे कौतुक करत आहेत. जान्हवीने लाल आणि काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस तसेच कानात डायमंडचे झुमके घातले आहेत, जे तिच्या लूकमध्ये भर घालत आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर किलर पोझ देताना दिसत आहे, जी चाहत्यांची मनं लुटत आहे.

अनन्या पांडे फाल्गुनी आणि शेन पीकॉकची शो स्टॉपर बनली आहे. अनन्याच्या एकूण लुकबद्दल सांगायचे झाले, तर तिने गुलाबी चमकदार शॉर्ट ड्रेस कॅरी केला होता. ज्याने तिचा ऑफ-शोल्डर लूक आणि लाँग ट्रेल आकर्षित केले. ग्रँड फिनालेसाठी अनन्या पांडे शोस्टॉपर असल्याने तिने लाँग ट्रेलसह एक आकर्षक गुलाबी गाउन परिधान केला. मेकअपबद्दल बोलायचे झाले, तर तिने बेस लाईट ठेवला, पण डोळ्यांचा छान मेकअप केला.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहे.

ैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा