‘…तर देशात एक वाक्यता टिकणार कशी?’, शरद पवारांचा मोदींवर काश्मीर फाईल्सवरून निशाणा

विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाला प्रदर्शित होऊन बराच काळ झाला असला तरी या चित्रपटांवरून सुरु झालेले वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला असून, प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी देखील या सिनेमाला चांगलीच पसंती दर्शवली आहे. काश्मिरी पंडितांवर ९० च्या दशकात झालेल्या अत्याचारनवर आधारित असलेल्या या सिनेमाने एक भयाण सत्य सर्वांसमोर मांडले आहे.

कलाकार, प्रेक्षक यांसोबतच राजकारणी देखील हा सिनेमे बघण्याचे आवाहन सर्वाना करत आहे. मात्र यासोबतच काही राजकारणी नेत्यांनी या सिनेमावर आणि या सिनेमाला पाठिंबा देणाऱ्या लोकांवर चांगलीच टीकेचे सूर ओढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील या सिनेमावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना एक प्रश्नच विचारला आहे.

शरद पवार यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, “काही लोकांनी एक मोहीमच सुरू केली आहे. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचा एक घटक निघून गेला आणि त्यावर एक सिनेमा आला. आता या चित्रपटातून लोकांची मने जोडण्याऐवजी त्यांची मने विचलित कशी होतील हे पाहिले. यासोबतच समाजा-समाजात कशा पद्धतीने अंतर वाढवता येईल याचा देखील प्रयत्न केला गेला असून, त्यांच्यात द्वेष कसा वाढेल अशी मांडणी सिनेमात करण्यात आली आहे. जेव्हा समाजात द्वेष वाढवण्याची भूमिका कोणी मांडत असेल आणि ती भूमिका चित्रपटात सांगितली गेली असेल तर तो चित्रपट अतिशय चांगला आहे बघितला पाहिजे. असे जर देशाचे पंतप्रधान म्हणत असतील तर सामाजिक एकवाक्यता टिकवायची कशी, ठेवायची कशी? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत”.

sharad pawar and kashmiri file
Photo Courtesy : Instagram/pawarspeaks and
vivekagnihotri

द काश्मीर फाईल्स या सिनेमाला भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्याने इतर पक्षातील सर्वच नेते भाजपाच्या नेत्यांना खडेबोल सुनावताना दिसत आहे. या सिनेमाला बघण्याचे आवाहन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना आणि देशाच्या पंतप्रधानांना सर्वानीच लक्ष केल्याचे चित्र सध्या राजकारणात पाहायला मिळत असून, या एका मुद्यावरून भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष एकत्र आल्यासारखे वाटत आहे. शरद पवार यांच्यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी देखील मोदींवर निशाणा साधला आहे.

View this post on Instagram

A post shared by CMO Delhi (@cmo.delhi)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष करत म्हटले की, “संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. ८ वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की ८ वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेले नाही. ८ वर्षे खराब गेले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावे लागत वाचव वाचव म्हणून…” तत्पूर्वी द काश्मीर फाईल्स सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत बक्कळ कमाई केली आहे. या सिनेमासमोर इतर सर्वच सिनेमे टिकाव धरत नसल्याचे देखील चित्र दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post