दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत एक मानाचे स्थान मिळवले आहे. आता श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीही आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत बॉलिवूड गाजवत आहे. तिचा चाहतावर्ग कमालीचा आहे. तिला सोशल मीडियावर तब्बल १ कोटीपेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ जान्हवीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच तिने सांगितले आहे की, तिची ‘अक्सा गँग’ परत आली आहे. जान्हवी या व्हिडिओत खूपच उत्साही दिसत आहे.
या टीमसोबतच मालदीवला गेली होती जान्हवी
जान्हवी कपूरने एप्रिलमध्ये आपल्या टीमसोबत काही डान्स व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. ही टीम जान्हवीसोबत मालदीवला गेली होती. यादरम्यान त्यांनी चांगलाच आनंद लूटला होता. सोमवारी (२१ जून) जान्हवीने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘अक्सा गँग परत आली आहे,’ असे म्हटले आहे.
खूपच स्टायलिश आहे जान्हवीचा लूक
व्हिडिओत जान्हवी एका फोटोशूटसाठी तयार असल्याचे दिसत होती. यासाठी तिने स्टायलिश बॅकलेस काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या व्हिडिओत तिच्या मित्रमंडळींसह जान्हवीनेही आपल्या हातात चप्पल घेऊन डान्स केला आहे. हा डान्स व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. व्हिडिओ पाहून चाहतेही लोटपोट झाले आहेत.
‘पितृदिना’निमित्त एकत्र केला होता डिनर
जान्हवी कपूरचा सावत्र भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूरने या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “या व्हिडिओबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी वेगळ्या डिनरची आवश्यकता आहे.” अर्जुन कपूर आणि जान्हवीसोबत संपूर्ण कुटुंबाने रविवारी रात्री ‘पितृदिना’निमित्त एकत्र डिनर केला होता. या डिनरच्या निमित्ताने अंशुला आणि खुशीसोबत वडील बोनी कपूरही होते. या खास डिनर रीयुनियनचे फोटो अर्जुनने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…