अक्षय- अहान शेट्टी चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या बातम्यांना उधाण; ‘फेक’ बातम्यांवर आता अक्षयने दिली प्रतिक्रिया


हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त कलाकार म्हणून अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. जिथे मोठमोठे कलाकार वर्षातून एकच चित्रपट करणे पसंत करतात तिथे अक्षय वर्षातून ३/४ सिनेमे करतो. त्याचे सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरतातच ठरतात. मागच्या वर्षांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे अक्षयचे अनेक सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज असतानाच दुसरीकडे तो नवनवीन चित्रपट देखील साइन करत आहे. यावर्षी देखील अक्षयने त्याच्या काही सिनेमांची घोषणा केली आहे.

अक्षय आगामी काळात त्याचा मित्र असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाच्या एका सिनेमात दिसणार असल्याच्या बातम्या झळकत आहेत. या सिनेमात अक्षयसोबत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसुद्धा महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या या बातम्यांवर आता अक्षयने स्वतः खुलासा केला आहे.

अक्षयने एका मोठ्या वेबपोर्टलच्या या बातमीवर रिट्विट करत लिहिले, ” खोट्या बातम्यांच्या पट्टीवर १० पैकी १० गुण, काय वाटते जर मी स्वतःच्या खोट्या बातम्यांचा पर्दाफार्श करण्याचा व्यवसाय सुरु केला तर?” त्याचे हे ट्वीट पाहून हे तर स्पष्ट झाले आहे की, तो अहान शेट्टीसोबत कोणत्याच प्रोजेक्टवर काम करत नाहीये.

अक्षयने रिट्विट केलेल्या पोर्टलच्या बातमीमध्ये सांगण्यात आले होते की, ‘बच्चन पांडे’ सिनेमानंतर तो साजिद नाडियाडवालाच्या पुढच्या सिनेमात अहान शेट्टीसोबत झळकणार आहे. मागच्या काही काळापासून अक्षयबद्दल येणाऱ्या अनेक खोट्या बातम्यांवर स्वतः अक्षयच खुलासा करताना दिसत आहे. याआधी देखील त्याने ‘बेलबॉटम’ सिनेमासाठी त्याची फी कमी केल्याच्या बातमीवर खुलासा केला होता.

अक्षयने नुकतेच एक ट्वीट करत ‘रक्षाबंधन’ सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो पोस्ट करत, त्याने हा सिनेमा त्याची बहीण अलकाला समर्पित केला असल्याचे सांगितले आहे.

अक्षय सध्या साजिदचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अहान शेट्टी सध्या ‘तडप’ या चित्रपटात तारा सुतारियासोबत काम करत आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट ‘आरएक्स १००’ चा हिंदी रिमेक चित्रपट असून साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मित करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.