सन २०२१ या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांनी करोडो रुपयांची घरे खरेदी केली आहेत. या कलाकारांमध्ये जान्हवी कपूर ते ऋतिक रोशन, अजय देवगण आणि आयुष्मान खुराना यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांनी कुठे आणि किती घरे खरेदी केली आहेत यावर एक नजर टाकूया…
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)
अभिनेत्री जान्हवी कपूरने यावर्षी जुहूसारख्या पॉश परिसरात घर खरेदी केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या घराची किंमत ३९ कोटींच्या आसपास आहे.
ऋतिक रोशन (Hrithik Roshan)
माध्यमांतील वृत्तानुसार, ऋतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोडवर तीन पेंट हाउस खरेदी केले आहेत. या मालमत्तेची किंमत १०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
ज्या कलाकारांनी प्रॉपर्टी खरेदी केली त्या यादीत या महानायकाचे नाव देखील समाविष्ट आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी यावर्षी मुंबईतील ओशिवारा येथे ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स देखील खरेदी केला आहे.
अजय देवगण (Ajay Devgan)
प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या स्टार्सच्या यादीत अजय देवगण याचे नावही सामील आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अजय देवगणने २०२१ मध्ये जुहूमध्ये एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे.
आयुष्मान खुराना
अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने देखील २०२१ मध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, आयुष्मानने चंदीगडच्या पंचकुलामध्ये ९ कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे.
हेही वाचा :
- Year Ending 2021: मनोरंजन विश्वातील ‘या’ जोड्यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय
- Memories 2021: ‘मिमी’ ते ‘छोरी’, बॉलिवूडच्या ‘या’ महिलाप्रधान चित्रपटांनी गाजवले २०२१
- Good Bye 2021: बिग बॉस ते खतरों के खिलाडी, २०२१ मधील रियॅलिटी शोचे विजेते, यादी पाहाच
हेही पाहा-