बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवीला प्रवास करायला किती आवडतो, हे सांगायची गरज नाही. अलिकडेच ती अभिनेत्री सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) केदारनाथला भेट देण्यासाठी गेली होती. नंतर तिने बहीण खुशी कपूरसोबत (Khushi Kapoor) दुबईमध्ये खूप मजा केली. आता वडिल बोनी कपूर यांच्या ‘मिली’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, जान्हवी पुन्हा एकदा मित्रांसोबत रात्री उशिरा मजा करताना दिसली. पण यादरम्यान तिने असे काही केले की, ज्यामुळे ती सोशल मीडियावर युजर्सच्या निशाण्यावर आली.
जान्हवी कपूर दिसली बाहेर फिरताना
जान्हवी शुक्रवारी (३ डिसेंबर) रात्री तिच्या मित्रांसोबत बाहेर गेली होती. काळ्या कटआउट शॉर्ट ड्रेसमध्ये हसत, फ्रेंड्ससोबत मजा करून जान्हवी परत तिच्या कारमध्ये बसण्यास आली. तिला पाहताच तेथे उपस्थित असलेल्या पॅपराजींनी तिला पोझ देण्यास सांगितले, मात्र तिने पॅपराजींना असे उत्तर दिले, जे चाहत्यांना अजिबात आवडले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करत सोशल मीडियावर तिची जबरदस्त शाळा घेतली.
पॅपराजींना दिले ‘हे’ उत्तर
प्रसिद्ध सेलिब्रिटी पॅपराजी व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जान्हवी तिच्या कारकडे जात तिच्या मित्रांना यायला सांगते. यासोबतच ती तिचा मास्कही मागते. जान्हवीला काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेस आणि हाय हील्समध्ये पाहून पॅपराजी तिला फोटो क्लिक करण्यास पोझ द्यायला सांगतात, तेव्हाच ती गाडीत बसताना त्यांना उत्तर देते, “सॉरी आता उशीर झाला.”
सोशल मीडियावर झाली ट्रोल
जान्हवीचे हे उत्तर अनेकांना आवडले नाही. सोशल मीडियावर युजर्स म्हणत आहेत की, जान्हवीमध्ये खूप ऍटिट्यूड आला आहे. एका युजरने लिहिले की, “ऍटिट्यूड तर पाहा मॅडमचा.” एका युजरने लिहिले की, “भावांनो, तुम्ही हिला का फॉलो करता, आम्हाला तर ती अजिबात आवडत नाही.” दुसऱ्याने लिहिले की, “तासंतास बाहेर होती, तेव्हा उशीर नाही झाला, तर एका फोटो क्लिक केल्याने उशीर होईल का.” तर एका युजरने तिच्यावर छोट्या ड्रेसवर कमेंट केली. त्याने लिहिले की, “ती तिची पॅन्ट विसरली आहे.” तिच्या ओव्हर ऍक्टिंगवर एका युजरने लिहिले की, “अभिनेत्री असे वागते, जसे ती तिचे मित्र किंवा कार शोधत आहे, पॅपराजींना ३६० कोनातून आऊटफिट दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.”
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या विरूद्ध ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ देखील याचवर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘दोस्ताना २’ आणि ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित
-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला