समुद्रकिनारी ‘मिस्ट्री मॅन’चा हात पकडून धावताना दिसली जान्हवी कपूर; चाहते म्हणाले, ‘तो नशीबवान आहे तरी कोण?’


आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप सोडणारी दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी होय. श्रीदेवीने आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखर गाठले होते. मात्र, आता तिची मुलगी जान्हवी कपूरदेखील आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपला जम बसवत आहे. जान्हवी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचा चांगलाच वावर आहे. ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच आता तिचा समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोत ती एकटी नसून तिच्यासोबत एक ‘मिस्ट्री मॅन’देखील आहे. तिचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. (Actress Janhvi Kapoor Shares Photo In Bikini With Sunset)

जान्हवीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती बिकिनी घातलेली दिसत आहे आणि लाटांमध्ये उभी राहून मावळत्या सूर्यासमोर पोझ देत आहे. याव्यतिरिक्त ती एका फोटोत समुद्रकिनारी एका व्यक्तीचा हात पकडून धावताना दिसत आहे. तरीही तिने हे स्पष्ट केले नाही की, तिच्यासोबत फोटोत दिसणारा व्यक्ती कोण आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या फोटोत फक्त समुद्र आणि मावळत्या सूर्याचे दर्शन होत आहे.

या फोटोला कॅप्शन देत जान्हवीने ‘कदाचित प्रत्येक अंधुक सूर्यास्ताचे सौंदर्य असे आहे की, ते फक्त एका क्षणासाठीच आहेत,‘ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

जान्हवीचे फोटो आणि कॅप्शन पाहून मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरने लिहिले की, “ओके ओके ओके.” याव्यतिरिक्त महीप कपूरनेदेखील फायर ईमोजी कमेंट केली आहे. दुसरीकडे बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानेही ‘वूssss’ असे लिहून आनंद व्यक्त केला आहे. तसेच चाहते या पोस्टवर कमेंट करत “तो नशीबवान व्यक्ती आहे तरी कोण?” असे प्रश्न विचारत आहे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर जान्हवी लवकरच सिद्धार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित ‘गुड लक जेरी’ आणि करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्येही झळकणार आहे. यापूर्वी जान्हवी ‘रूही’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्माही होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.