‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस


खेळ कोणताही असो, त्यात आपण नेहमीच खेळाडूंकडून अफलातून प्रदर्शनाची अपेक्षा करतो. मात्र, असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा खेळाडूच नाही, तर प्रेक्षकसुद्धा असे काही करतात, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले जाते. आता खरोखरच असेच काहीसे मागील आठवड्यात सॅन डिएगो पॅड्रेस आणि शिकागो कब्समधील बेसबॉल सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. एका महिलेने अविश्वसनीय पद्धतीने एका हाताने फाऊल चेंडू पकडून माध्यमांचे लक्ष वेधले. या महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आणि त्यावर बातम्याही बनल्या. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही  इम्प्रेस झाली आणि तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Women Incredible One Hand Catch While Holding Baby At Baseball Game Anushka Sharma Impressed)

झालं असे की, लेक्सी व्हाईटमोर नावाची एक महिला आपला ३ वर्षांचा मुलगा मेवरिकला कुशीत घेऊन स्टेडिअममध्ये थांबलेली असते. त्याचवेळी मैदानावरून आलेला चेंडू तिने एका हाताने शानदार पद्धतीने झेलला. लेक्सीच्या या झेलने उपस्थित प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. हा क्षण काही वेळानंतर एमएलबीने एका कॅप्शनसह यूट्यूबवर शेअर केला आहे. त्यामध्ये लिहिले होते की, “आई, एका मुलाला पकडून काहीही करू शकते. इतकेच नव्हे, तर एका हाताने फाऊल चेंडूही पकडू शकते.” ट्विटरवरही हा व्हिडिओ जोरदार शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करून ‘आई शानदार असते,’ असे कॅप्शन दिले जात आहे.

अनुष्काची प्रतिक्रिया
खरं तर हा झेल थेट तिच्या हातात गेला नव्हता. कारण चेंडू लेक्सीच्या हातात येण्यापूर्वी स्टँडच्या वरच्या भागाला लागून उसळला होता. मात्र, तरीही तिने ज्या पद्धतीने एका हातात आपल्या मुलाला पकडून दुसऱ्या हाताने झेल घेतला होता, ते प्रशंसनीय आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही या झेलचे वृत्त आपल्या इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहे. तिने हे वृत्त शेअर करत लिहिले की, “असे काहीच नाही, जे आम्ही करू शकत नाही.”

विशेष म्हणजे अनुष्का शर्मा ही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आहे. ती नेहमी आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांना हजेरी लावताना दिसते. ती नुकतीच एका मुलीची आई झाली आहे. तिच्या मुलीचे नाव वामिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

-सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

-‘लगान’ला २० वर्ष पूर्ण; ‘लाल सिंह चड्ढा’च्या या हटके लुकमध्ये आमिर खानने मानले चाहत्यांचे आभार


Leave A Reply

Your email address will not be published.