Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जुई गडकरी ओळखली जाते. तिने अनेक चांगल्या मालिकांमध्ये काम करत तिची ओळख निर्माण केली. जुईने तिच्या करियरमध्ये सहायक, नकारात्मक, मुख्य अभिनेत्री अशा अनेक भूमिका साकारल्या. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेने. या मालिकेनंतर तिला घराघरात ओळख मिळाली.

जुई गडकरीची लोकप्रियता आसमंताला होती, मात्र अशातच मालिका संपली आणि जुई देखील या क्षेत्रातून गायब झाली. अनेक वर्ष ती कुठेही दिसली नाही. मात्र नुकतीच तिची एक नवीन मालिका टीव्हीवर सुरु झाली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून बरीच काळानंतर तिने अभिनयात पुनरागमन केले.मालिका खूपच कमी कालावधीत चांगलीच हिट ठरली असून, लोकांचे भरभरून प्रेम मालिकेला मिळत आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. हेच औचित्य साधत जुईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मागील बऱ्याच काळापासून एका गंभीर आजाराचा सामना करत असणाऱ्या जुईची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जुईने या मालिकेसंदर्भात आणि तिच्या आजाराबद्दल पोस्ट शेअर करत एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. जुईने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज आमच्या “ठरलं तर मग” चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!!
तो पहिला कॉल आज खुप आठवतोय!! त्या एका कॅाल ने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलैला मी सोहम प्रॅाडक्शन्स चा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला “सायली” दिली!!!
हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!! कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं त्रुणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन!
तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहमी पाठीशी असुद्या. त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची. जय गुरुदेव दत्त”

यासोबतच तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सेटवरील वातावरण दिसत आहे. दरम्यान जुईने ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ आदी अनेक शो केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात मिळते प्रेम” पाकिस्तानमधील ‘या’ अभिनेत्रीने सांगितले सत्य

VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’

हे देखील वाचा