Saturday, July 27, 2024

“पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात मिळते प्रेम” पाकिस्तानमधील ‘या’ अभिनेत्रीने सांगितले सत्य

भारतात नेहमीच पाकिस्तानबद्दल वेगवेगळ्या बातम्या माहिती व्हायरल होत असते. पाकिस्तानी कलाकार हा पण याचाच एक भाग आहे. उरी हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्यात आले. आधी भारतात येऊन अनेक पाकिस्तानी कलाकारांनी त्यांची ओळख निर्माण केली. या यादीत अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या लोकांची नावे आपण घेऊ शकतो. असे असले तरी भारतामध्ये अनेक पाकिस्तानी मालिकांचे चाहते आहे. या मालिका येथे देखील मोठया आवडीने पाहिल्या जातात. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या सबीना फारुख बद्दल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. सबीना फारुखने तिला भारतातून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे.

सबीना फारुख ‘तेरे बिन’ नावाच्या मालिकेमध्ये काम करत असून, तिची ही मालिका आणि तिची भूमिका भारतात चांगलीच गाजत असून, तिला येथे मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. एका मुलाखतीमध्ये तिला भारतातून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला ज्यावर तिने उत्तर दिले आहे. भारतातून तिच्या ‘हया’ या भूमिकेबद्दल मिळणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल किती पण बोलणे कमी असणार आहे. असे ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sabeena Farooq (@sabeena_farooq)

सबीना फारुख या मुलाखतीदरम्यान म्हणाली, “भारतातील माझे फॅन्स मला खूपच चांगल्या आणि जबरदस्त प्रतिक्रिया देतात. भारतातून माझ्या भूमिकेबद्दल अतिशय सुंदर आणि डिटेल मेसेज मला केले जातात. ते लोकं खरंच माझ्या भूमिकेचे खऱ्या अर्थाने कौतुक करतात. हे पाहून आणि ऐकून मला खरंच खूपच छान वाटते.

पुढे सबीना फारुख म्हणाली, “ज्या पद्धतीने माझ्या भूमिकेला भारतातून प्रेम मिळते, तसे प्रेम पाकिस्तानमधून नाही मिळत. हे माझ्यासाठी खूपच आश्चर्यजनक आहे. नकारात्मक भूमिकेमुळे येथे लोकं माझ्यासाठी खूपच चुकीचे आणि वाईट लिहितात.” याबद्दल तिच्या मनात असलेली सल देखील तिने व्यक्त केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा