मराठी मालिकेतील सालस सुनेच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी होय. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत काम करून अभिनेत्री जुईने चाहत्यांच्या मनात विषेष स्थान मिळवले. ती अगदी उत्तमरित्या आपली भूमिका पडद्यावर मांडते. सोज्वळ व्यक्तीमत्व कसे असावे, हे ती तिच्या अभिनयातून सादर करते. अभिनयासोबतच जुईच्या सौंदर्याचे देखील लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
जुई फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातूम चाहत्यांची मन जिंकत असते. आता जुईने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून चाहते चकित झाले आहेत. जुई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ती चर्चेत ही येते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओमध्ये जुई एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जुई बाजारात भाजी घेताना दिसत आहे. बाजारात फिरताना जुईने तोंडाला स्कार्फ बांधले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना जुईने लिहीले की, “जे लोक मला ओळखतात त्यांना माझ्या भाज्या खरेदीबद्दलच्या प्रेमाबद्दल माहिती आहे. मी कुठेही जाऊन ताजी भाजी घेऊ येते. ही रिल बघितल्यानंतर कर्जतमधील उत्साह तुम्हालाही जाणवेल”. जुई कर्जतमधील शुक्रवारच्या आठवडी बाजारात गेली होती. पण चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी तिने हा प्रयोग केला आहे. सध्या तिच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
जुईच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून बरीच काळानंतर तिने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले आहे. ही मालिका खूपच कमी कालावधीत चांगलीच हिट ठरली आहे. या मालिकेला लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. तिने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेद्वारे टीव्ही विश्वात पदार्पण केले होते. नंतर ती ‘माझी या प्रियाला प्रीत कळेना’मध्ये झळकली होती. (Actress Jui Gadkari was seen buying vegetables in the market)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
नाेराच्या हटके ड्रेसने वेधले चाहत्यांचे लक्ष, फाेटाे व्हायरल
मालदिवमध्ये रकुल प्रीत सिंगचा ‘सफरनामा’