प्रत्येक स्त्रीसाठी तिचे गरोदरपणातील दिवस फार महत्वाचे असतात. यावेळी ती स्वतःची अधिक काळजी घेत असते. अशात अभिनेत्री काजल अग्रवाल देखील गरोदर असल्याचे म्हटले जात आहे. तिने साल २०२० मध्ये गौतम बरोबर विवाह केला. तिच्या लग्नांनंतर सोशल मीडियावर ती आई होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी तिने स्वतः ही अफवा असल्याचे सांगितले होते. आता साल २०२१ मध्ये पुन्हा ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यामुळेच तिने तिच्या सर्व चित्रपटांमधून काढता पाय घेतला आहे. अनेक दिग्दर्शकांना तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला.
https://www.instagram.com/p/CUJ078TMcXk/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या तिने नागार्जुनच्या ‘द घोस्ट’ चित्रपटाचे काम थांबवले आहे. याची माहिती तिने चित्रपटाच्या निर्मात्यांना दिली. आता या चित्रपटामध्ये तिच्या जागी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज झळकणार आहे. तिचा हा निर्णय निर्मात्यांना मान्य आहे. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामध्ये तिच्या जागी जॅकलिनला घेतले आहे. परंतु अद्याप हे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे सर्व चाहत्यांचे याकडे लक्ष लागले आहे. (Actress Kajal Agarwal pregnent replaced by actress Jacqueline Fernandez in the ghost movie)
‘आचार्य’ चित्रपटासाठी केली होती मोठी तयारी
काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की, अभिनेत्री ‘आचार्य’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटामध्ये विशेष स्टंट करताना दिसणार आहे. यासाठी तिने खूप प्रॅक्टिस देखील केली आणि स्टंटचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. परंतु आता तिने या चित्रपटात काम करण्यासही नकार दिला आहे. कोणत्याही चित्रपटामध्ये काम करणार नाही हे समजल्यावर आता ”आचार्य’ ‘ चित्रपटामध्ये तिची जागा कोण घेणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
https://www.instagram.com/p/CUO741UMGcj/?utm_source=ig_web_copy_link
काजल चित्रपटांपासून सध्या दूर असली, तरी सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच तिने एक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती तिच्या रेफरल कोडची माहिती चाहत्यांना देत आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध
-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज