Wednesday, June 26, 2024

खास क्षण! वैवाहिक आयुष्यात चांगलीच रमलीये काजल, साजरा केला लग्नानंतरचा दुसरा करवा चाैथ

यावर्षी 13 ऑक्टोबरला देशभरात करवा चौथ साजरा केला जात आहे. विवाहित महिलांसाठी हा सण खूप विशेष असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत ठेवतात. धार्मिक मान्यतेनुसार हा व्रत केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. त्यामुळे करवा चाैथ या सणाची धामधूम सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड अभिनेत्रींपर्यंत पाहायला मिळत आहे. अशातच आता दक्षिण आणि बॉलीवूडची सुंदर आणि लाेकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवालचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये तीने पतीच्या नावाची मेहंदी लावली आहे.

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)हिने करवा चौथ स्पेशल तिचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या हातावर मेहंदी लावताना दिसत आहे. यामध्ये तिने गळ्यात मोठा नेकलेस घातला असून ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा सिंपल लूक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचे सिंपल लूक मन जिंकणारे आहे. त्याचबरोबर तिची मेहंदी देखील खूप छान दिसत आहे.

Kajal-Aggarwal
Photo Courtesy: instagram/kajalaggarwalofficial

काजल हातावरची मेहंदी दाखवत जबरदस्त पोज देत आहे. तिचे हे फाेटाे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. काजलने फोटो शेअर करण्यासोबतच गौतम कीचलू यालाही टॅग केले आहे. काजल यावर्षी लग्नानंतरचा तिसरा करवा चौथ साजरा करत आहे. करवा चौथ हा प्रत्येक महिलांप्रमाणेच तिच्यासाठी खूप खास आहे आणि या काळात ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.

काजल अग्रवालने दिला मुलाला जन्म
काजल अग्रवालने दोन वर्षांपूर्वी बिझनेसमन गौतम कीचलूसोबत लग्न केले. 30 ऑक्टोबर 2020ला त्यांचे लग्न झाले. एका मुलाखतीदरम्यान काजलने तिच्या आणि गौतमच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते की, दोघांनी लग्नाच्या आधी 3 वर्षे एकमेकांना डेट केले. या आधी 7 वर्षांपासून त्यांची मैत्री होती. यादरम्यान दोघांनी एकमेकांना जवळून ओळखले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन दरम्यान, जोडप्याला समजले की, ते एकमेकांसाठी बनलेले आहेत. अशात त्यानी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघेही त्यांचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत असून या वर्षी काजलने पहिल्या मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव त्यानी नील ठेवले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
जेव्हा पहिल्या भेटीतच लीना यांनी नाकारले किशोर कुमार यांचे प्रपोसल, पुढे ‘अशी’ झाली लव्हस्टोरीला सुरुवात

‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा

हे देखील वाचा