Friday, December 1, 2023

“माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ…”; अभिनेत्री काजोल देवगणच्या पोस्टमुळे खळबळ

बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोल देवगणला ओळखले जाते. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये 90चे दशक तुफान गाजवले होते. आजही ती विविध प्रवाहाच्या बाहेरील भूमिका करत तिच्यात असणाऱ्या एक उत्तम अभिनेत्री प्रेक्षकांपुढे सादर करत असते. चाहत्यांसोबत अनेकदा हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करणारी अभिनेत्री काजोल सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे.

काही काळापूर्वी अभिनेत्रीने काजोल (kajol devgan) इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती सोशल मीडियापासून दूर जात आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. काजोलचे चाहते नाराज झाले आहेत. त्यामुळे काजोल सध्या चर्चेत आहे. काजोलला हे पाऊल का उचलावे लागले, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर काही लोकांना वाटत आहे की पती अजय देवगण सोबत तिचा वाद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याचा सामना करत आहे. मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.” त्याचवेळी तिने सोशल मीडिया अकांउटवरचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे चाहते पेचात पडले आहेत. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तिच्या पोस्टवर चाहते एकापेक्षा एक कमेंट करत आहेत.

एका युजरने म्हटले की,”काजोल आशा करतो की तू ठीक आहेस बाळा”, तर दुसऱ्या युजरने लिहीले की, “लव्ह यू, काळजी घे.” काजोलचे इंस्टाग्रामवर एकूण 14.4 मिलियन फॉलोअर्स आहे. त्यासाठी अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची. काजोलविषयी बोलायच झाले तर, काजोल लवकरच ‘ लस्ट स्टोरीज 2’ मध्ये दिसणार आहे. (Actress Kajol Devgan’s post caused a stir)

हे वाचा-
साेनमने जुन्या आठवणीना दिला उजाडा, करिअरच्या सुरुवातीचे शेअर केले फाेटाेशूट
नाना पाटेकरांबाबत डिंपल कपाडियांच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ; म्हणालेल्या, “ ‘मी त्यांची भयानक…”

हे देखील वाचा