Friday, December 8, 2023

नाना पाटेकरांबाबत डिंपल कपाडियांच्या वक्तव्याने उडाली होती खळबळ; म्हणालेल्या, “मी त्यांची भयानक…”

डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर हे दोन सर्वात नावाजलेले कलाकार आहेत. त्यांनी मनोरंजन विश्वात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नाना आता बॉलीवूड चित्रपटांमध्ये कमी दिसतात. एक काळ असा होता की, चित्रपटात नानाची उपस्थिती पुरेशी होती. नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

खलनायक, पोलिस अधिकारी अनेक प्रकारच्या भूमिका असनारे पात्र नानांनी पडद्यावर साकारले आहे. पण नंतर अशी वेळ आली की, तेव्हा मीटूच्या क्षणी नानांवर काही आरोप केले गेले. तेव्हापासून ते पडद्यावर फारसे दिसले नाहीत. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि नाना पाटेकर यांनी काही चित्रपटांमध्ये स्क्रीन देखील शेअर केली आहे.

अभिनेत्री डिंपल यांना नाना पाटेकर यांच्यासोबत पुन्हा एकत्र काम करण्याबद्दल विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना डिंपल नानांबद्दल असं काही बोलून गेल्या की ज्याची चर्चा सर्वत्र झाली होती. त्या म्हणाल्या की, “मला नाना किळसवाणे वाटतात.”

तसेच डिंपल म्हणाल्या की, “नाना चांंगल्या आणि वाईट दोन्ही मार्गाने खूप प्रतिभावान आहेत. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही चुका मी माफ करू शकते. मला नानांचा अभिनय इतका आवडतो की त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते. एक व्यक्ती म्हणून नाना माझ्यासोबत खूप चांगले राहतात. आम्ही दोघे खूप चांगले मित्रही आहोत ”

पुढे डिंपल म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीला दोन बाजू असतात. त्यातली नकारात्मक बाजू आपण सर्वांपासून लपवून ठेवतो. तशीच नकाराचत्मक बाजू नानांची देखाल आहे. त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवली आहे.

डिंपल कपाडिया यांच्या विषयी बोलायच झाले तर, डिंपल कपाडिया यांनी बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर लवकरच चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. त्या नुकत्याच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रटात झळकल्या होत्या. ‘सास बहू और फ्लेमिंगो’ या वेब सीरिजमध्ये देखील त्यांना काम केले आहे. (Dimple Kapadia’s statement about Nana Patekar caused a stir)

हेही वाचा-
‘ओह माय गॉड 2’ चित्रपट ‘या’ तारखेला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित, अक्षयने दाखवले भगवान शिवचे रूप
सुंबुल ताैकीरचे वडिल दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात; अभिनेत्री म्हणाली, “आम्ही आमच्या नवीन आईचे…’

हे देखील वाचा