Monday, July 15, 2024

कंगनाने मणिकर्णिका फिल्म्सच्या टीमसोबत साजरी केली दिवाळी, एकता कपूरच्या पार्टीत देखील उपस्थित, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये सध्या दिवाळीची पार्टी सुरू आहे. बी टाऊनच्या अनेक स्टार्सनी दिवाळी पार्टी होस्ट केली आहे. बॉलीवूडच्या या दिवाळी पार्टीत बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स हजेरी लावत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकता कपूर हिने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक बी-टाऊन स्टार्स पोहोचले होते, पण सगळ्यांचे लक्ष कंगना रणौत, करण जोहर आणि तापसी पन्नू हिने वेधले होते कारण तिन्ही स्टार्स एकाच पार्टीत सहभागी झाले होते.

कंगना(kangana) हिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर दिवाळी सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. तिने तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या टीमसोबत सेलिब्रेशन केले. यानंतर तिने एकता कपूर(ekta kapoor) हिच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. कंगना रणौत तिच्या इन्स्टा स्टोरीवर मणिकर्णिका फिल्म्स आणि आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या टीमसोबत पोज देताना दिसली. कंगनाने तिच्या ऑफिसमध्ये टीमसोबत दिवाळी साजरी केली. फोटो शेअर करत तिने लिहिले, “आज ऑफिसमध्ये सणासुदीचे वातावरण.” यावेळी कंगना रणौत ऑफ व्हाइट सिल्क साडीमध्ये दिसली. यावेळी कंगना खूप आनंदी दिसत होती.

kangana-ranaut

यानंतर कंगना रनौतने एकता कपूरच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. एकता आणि कंगना खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अनीस बज्मी, अश्वनी अय्यर तिवारी, एकता कपूर यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटीही दिसत होते. एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत कंगना रणौत पारंपरिक हिरव्या रंगाच्या पोशाखात पोहोचली होती. त्यात ती खूप सुंदर दिसत होती हे फाेटाे शेअर करताना कंगना राणौतने दिव्याच्या इमोजीसह ‘फेस्टिव्ह मूड’ असे लिहिले आहे. तिचे चाहते या फोटोंवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत करण जाेहरनेही लावले हजेरी
एकता कपूरच्या दिवाळी पार्टीला टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरही दिसला. करण जोहरने काळ्या, लाल आणि पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. त्यात्या आउटफिटची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने या आउटफिटवर मॅचिंग रिंग घातली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री नुसरत भारुचा हिचा ग्लॅमरस लुक! घागऱ्यामध्ये दिले हटके पोज
प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर केलं शेअर

हे देखील वाचा