प्रभासच्या वाढदिवसानिमित्त ओम राऊतने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर केलं शेअर

0
73
adipurush movie
photo courtesy: instagram/omraut

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात झळकून नावारूपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रभास(Prabhas) होय. त्याने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे, परंतु त्याच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने त्याला जगभर ओळख निर्माण करून दिली आहे. सध्या प्रभास पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्याचा ‘आदिपुरुष‘(Adipurush) चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे आज प्रभासचा 43 वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

चित्रपटच्या निर्मात्यांनी 23 ऑक्टोबरचे औचित्य साधून आदिपुरुष चित्रपटातील त्याचा नवा लूक समोर आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत सांगतात की, प्रभास हा आपल्या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हे पोस्टर त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत आहे. ओम राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दमदार संदेश देत चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिले, “मिळवूनी वानरसेना राजा राम प्रगटला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम.”

 

View this post on Instagram

 

या चित्रपटात प्रभास ‘प्रभू श्रीरामाची’ भूमिका साकारत आहे. अभिनेत्री क्रिती सनॉन सिता’ हे पात्र ती साकारणार आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेता सनी सिंग चित्रपटात ‘लक्ष्मणा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ‘हनुमाना’ची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानने ‘रावणाची’ भूमिका साकारली आहे. एवढेच नाही तर ‘आदिपुरुष’चे निर्माते ओम राऊत, प्रभास, सैफ अली खान यांच्यासह पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आदिपुरुषला त्याच्या व्हीएएफएक्समुळे ट्रोलही केले जात आहे. सोशल मीडियावर युजर्सनी ‘रावण’च्या लूकची खूप खिल्ली उडवली आहे. या चित्रपटात दाखवले जाणारे व्हीएएफएक्स अतिशय वाईट असल्याचेही लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी व्हीएएफएक्सची तुलना टेंपल रन गेमशी केली. ओम राऊत यांनीही ट्रेलरला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादानंतर स्पष्टीकरण दिले आहे. आदिपुरुष हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी 3D मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकिंग! अभिताभ बच्चन यांनी कापली नस, रूग्णालयात दाखल

अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here