Saturday, June 29, 2024

Kangana Ranaut: ‘हीच ती योग्य वेळ…’ कंगना रणौत निवडणुक लढवणार?

बॉलिवूडची ‘ड्रामाक्विन’ कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडसह सामाजिक मुद्द्यांवर ती तिचं परखड मत मांडत असते. दरम्यान, कंगना रणौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. अभिनेत्रीने आता राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल भाष्य केलं आहे.

एका इवेंटदरम्यान कंगनाने (Kangana Ranaut) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कंगनाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी ‘मला ही घोषणा करण्याचा अधिकार नाही.’ असं हसत कंगना म्हणाली. पण मला एका जागरुक व्यक्ती बनन्यापासून कोणी थांबवलेलं नाही. खरतरं निवडणुक लढवणारे जितकं देशासाठी करत नाहीत तितकं मी देशासाठी कामं करते.

मी खऱ्या जीवनात नाही तर चित्रपटाच्या सेटवरुन राजकीय पक्षांशी लढले आहे. त्यामुळे मला दूर ठेवता येणार नाही. मला माझ्या देशासाठी जे करायचे आहे ते करायला मला संधी मिळत नाही. पण, जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर कदाचित हीच योग्य वेळ आहे. असे मला वाटते. असं मोठं विधान करत कंगनाने (Kangana Ranaut) राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत दिलं आहेत.

मी देशप्रेमी आहे. या देशाने आणि येथील जनतेने मला बळ दिले. मी उत्तरमधून आली आहे. मी दक्षिणेत काम केले आहे, मी दिल्लीसह हरियाणाच्या मुलींची भूमिका बजावली आहे. या देशाने मला खूप काही दिले आहे, आणि परत देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अशी भावना कंगनाने यावेळी व्यक्त केली.

यापूर्वीही कंगना (Kangana Ranaut) राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली होती. एका मुलाखतीत कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. तसेच यावेळी तिनं २०२४ च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग पाहण्याची इच्छा वर्तवली होती. तिच्या या वक्तव्यावरुन कंगनाने जर राजकारणात एन्ट्री घेतली तर भाजपमधून निवडणूक लढवू शकते. असा कयास तिचे चाहते बांधू लागले.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तर ती आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’मध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेतच नाही तर तिने दिग्दर्शनही केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विष्णू मंचू स्टारर ‘कन्नप्पा’साठी देखील अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रभास भगवान शिवाची भूमिका साकारणार आहे, तर विष्णू मंचू त्याच्या भक्ताची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा:

‘स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री नाही’, नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाला?

Virat Kohli: लंडनमध्ये बाप-लेकीची लंच डेट; ‘तो’ क्यूट फोटो व्हायरल

हे देखील वाचा