सध्या चित्रपट क्षेत्रात सर्वत्र दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘गहराइयां’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या एका सीनबद्दल अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) नाराजी व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा ‘गहराइयां’ चित्रपट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या बोल्ड सीनची तर जास्त चर्चा होताना दिसत आहे. अनेकजण यावर बोलताना दिसत आहेत. आता या चित्रपटाबद्दल अभिनेत्री कंगना रणौतने आपले मत व्यक्त केले आहे ज्यामध्ये ती टीका करताना दिसत आहे. यावरून आता दीपिका-कंगना वाद रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
या चित्रपटाबद्दल अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी ठेवली आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, “तरुणाईला आवडतात म्हणून आणि आधुनिक जगात सगळं चालतं, म्हणून अशा प्रकारचे बोल्ड सीन दाखवणे चुकीचे आहे. कृपया असे काही करू नका. वाईट चित्रपट हा वाईटच असतो. मग त्याला तुम्ही कितीही बोल्ड दाखवा, नाहीतर त्यात पॉर्न दाखवा. बोल्डनेसच्या नावाखाली काहीही खपवू नका. चित्रपटात काहीही तथ्य नाही.” आता कंगनाच्या या दाव्यावर दीपिका काय उत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे.
हेही पाहा- प्रेमात असूनही ‘लता मंगेशकर’ का राहिल्या अविवाहित? । Lata Mangeshkar Unsuccessful Love Story
तत्पूर्वी ‘गहराइयां’ चित्रपटाचे दिग्दर्शक शकुन बात्रा यांनी आणि चित्रपटातील कलाकारांनी जोरदार प्रमोशन केले होते. चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात जबरदस्त प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा झाली होती. मात्र चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही.
हेही वाचा