Monday, May 27, 2024

निर्माते मुद्दाम टाकत असत चित्रपटात झीनत यांच्या अंघोळीचा सीन; कित्येक वर्षांनी कारण आलं समोर

अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या सौंदर्याचे आणि नृत्याचे अनेक चाहते आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. नुकतेच झीनत अमान कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात सहभागी झाली होती यावेळी तिने आपल्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से सांगितले आहेत.

सत्तर-ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांचे नाव आजही घेतले जाते. आपल्या बहारदार नृत्याने त्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. झीनत यांना डान्स करताना पाहणे, त्यांच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असायची. नुकतेच त्या सोनी चॅनलवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपट जगतातील प्रवासात आलेले अनेक रंजक किस्से सांगितले. कार्यक्रमात कपिल शर्मा झीनत यांचे कौतुक करत म्हणाला, “आम्ही तुमचे डान्स पाहिले आहेत किती अप्रतिम डान्स करायचा तुम्ही पाण्यामधील भिजत भिजत केलेले डान्सतर सगळ्यात भन्नाट.” यावेळी कपिलने त्यांची फिरकी घेताना, “तुम्ही अनेकदा भिजत भिजत डान्स केले आहेत, दिग्दर्शकाला तुम्ही मी अंघोळ करून येते, असं का सांगितले नाही,” असा मजेशीर प्रश्न केला. यावर झीनत अमान यांनीही भन्नाट उत्तर दिले आहे.

कपिल शर्माच्या या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “कोणी तरी मला सांगितले होते की, मी असा डान्स केल्याने दिग्दर्शकावर नोटांचा पाऊस पडतो. त्यामुळेच ते मला असा डान्स करायला लावायचे.” त्यांच्या या उत्तराने सगळेच हसायला लागले. कपिल शर्माच्या या कार्यक्रमात झीनत यांनी खूप मजा-मस्ती केलेली पाहायला मिळाली.

अभिनेत्री झीनत अमान या त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी त्या काळातील प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले आहे. त्यांनी केलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटाचे आजही कौतुक केले जाते. चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही पाहा –
ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन दोन विश्वसुंदरींमध्ये ‘या’ गोष्टीवरून सुरु झाले शीतयुद्ध
जेव्हा ऐश्वर्याला घाबरून सुष्मिताने घेतला होता मिस युनिव्हर्सच्या यादीतून नाव मागे घेण्याचा निर्णय, जाणून घ्या तो किस्सा

हे देखील वाचा