सध्या महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. अशामध्ये वाद-प्रतिवाद मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण दूषित झाल्याचे राजकीय विश्लेषकांकडून म्हटले जात आहे. अशात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारी बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत हिने या प्रकरणात उडी घेतली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि सध्याच्या सत्तासंघर्षावर मत व्यक्त केले आहे. तिने हनुमानाला शंकराचा १२वा अवतार सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
बुधवारी (दि. २९ जून) रात्री उशिरा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदासोबत विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा (Uddhav Thackeray Resign) दिला आहे. महाराष्ट्रात आता नवीन सरकार स्थापन होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे म्हटले जात आहे की, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात.
कंगना रणौतचा व्हिडिओ
अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कंगनाने हनुमानाला शंकराचा १२वा अवतार सांगत निशाणा साधला. सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
‘दोन वर्षांपूर्वी मी म्हणाले होते की, लोकशाही हा विश्वास आहे’
या व्हायरल व्हिडिओत कंगना म्हणाली की, “१९७५नंतर हा काळ भारताच्या लोकशाहीचा सर्वात महत्वाचा काळ आहे. १९७५मध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या हाकेने सिंहासन सोडाची जनता येते आणि सिंहासन कोसळते. २०२०मध्ये मी म्हणाले होते की, लोकशाही ही एक विश्वास आहे आणि जो सत्तेच्या अभिमानाने हा विश्वास तोडेल त्याचा गर्वही तुटणार हे नक्की. ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची शक्ती नाही. हीच खऱ्या चारित्र्याची ताकद आहे.”
‘त्यांना शंकरही वाचवू शकत नाहीत’
एवढेच बोलून कंगना थांबली नाही, तर ती व्हिडिओत पुढे आणखी बरंच काही बोलली. ती म्हणाली, “दुसरे म्हणजे… हनुमानजींना शिवाचा १२वा अवतार मानले जाते आणि जेव्हा शिवसेनेने हनुमान चालीसावर बंदी घातली, तेव्हा शिवही त्यांना वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.”
हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाप वाढले की विनाश होतो आणि त्यानंतर निर्मिती होते, आणि जीवनाचे कमळ फुलते.”
कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कंगनाने यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध वक्तव्य केले होते. २०२०मध्ये जेव्हा कंगनाचे मुंबई येथील ऑफिस बीएमसीने पाडले होते, तेव्हा तिने व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. हा व्हिडिओही मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-