Monday, June 24, 2024

‘हा तर फक्त एक नेता आहे’ निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह यावर त्यांचा निर्णय देत दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा जाहीर केले. या निर्णयानंतर शिंदे गटात आनंद निर्माण झाला तिथे ठाकरे गटात नाराजी पसरली. सोशल मीडियावरही यानंतर निर्णयानंतर अनेक पोस्ट येऊ लागल्या. इथे देखील दोन गट निर्माण झाले. काहींनी शिंदेंना तर काहींनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला. मनोरंजनविश्वातील कलाकारांनी देखील या मोठ्या राजकीय घटनेबाबत मत मांडण्यास सुरुवात केली. यातच बॉलिवूडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने देखील यावर भाष्य उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे पण टीका केली.

कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करताना ठाकरे गटावर टीका करताना तिच्यावर त्यांनी केलेल्या अन्यायाची देखील सर्वांना आठवण करून दिली. त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळत असल्याचे तिने त्यात लिहिले. कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, “देवतांचा राजा असूनही इंद्र सुद्धा चुकीचे कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडायचा. मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने अन्याय करून माझे घर तोडले, तेव्हाच माझ्या लक्षात आले की, लवकरच त्याची सत्ता जाईल. देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा चांगले स्थान मिळवू शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाहीत.”

तत्पूर्वी कंगना रणौतने २०२१ साली एक ट्विट केले होते की, “साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करणाऱ्याचा विनाश निश्चित आहे.” तिचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. हेच एका ट्विटर युजरने रीट्वीट करत लिहिले, ‘तिने आधीच अंदाज बांधला होता, म्हणूनच ती क्वीन आहे’. यावर उत्तर देताना तिने लिहिले, “हो भलेही ते मी लिहिले, पण ती भविष्यवाणी नव्हती, कॉमनसेन्स होता.” आता कंगनाने याच ट्वीटवर कमेंट करत तिचे नवीन ट्विट केले होते. दरम्यान यानंतर तिच्या कमेंट बॉक्समध्ये दोन्ही गटांमधील युजर्सच्या कमेंट पाहायला मिळाल्या. काहींनी कंगनावर कडाडून टीका केली, तर काहींनी तिला पाठिंबा दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन इंस्टग्रामवरुन करताे भक्कड कमाई, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा