बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या देशातील प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत होय. कंगना आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखली जाते. अनेकवेळा तिला आपल्या ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. याव्यतिरिक्त तिचे माध्यमांतील वृत्तांवरही लक्ष असते, त्यावरही ती प्रतिक्रिया देत असते. सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे चर्चेत आले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, माजी पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपये मागितल्याचा गंभीर आरोप लावला आहे. यावर आता कंगनानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने माध्यमातील एक वृत्त रिट्विट करत लिहिले की, “जेव्हा मी महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचार आणि वाईट प्रशासनाबद्दल बोलले होते, तेव्हा मला शिव्या, धमक्या आणि टीकांचा सामना करावा लागला होता. परंतु जेव्हा माझ्या शहराबद्दलचे प्रेम आणि निष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, तेव्हा मी शांतपणे रडत बसले. जेव्हा त्यांनी माझं घर तोडलं, तेव्हा अनेकांनी आनंद साजरा केला.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1373317120973438977
“येत्या काही दिवसांमध्ये या सर्वांचा पर्दाफाश होईल. आज मी खंबीरपणे उभी आहे म्हणून हे सिद्ध होते की, माझ्या शूर राजपुताना रक्तात देशासाठी निष्ठा आणि खरे प्रेम आहे, जे माझे आणि माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करतात. मी खरी देशभक्त आहे,” असेही कंगनाने पुढे लिहिले.
https://twitter.com/KanganaTeam/status/1373318967293480961
यापूर्वी कंगनाने परमबीर सिंग यांच्या बदलीचे वृत्त रिट्विट करत लिहिले होते की, “हा तोच व्यक्ती आहे, ज्याने मुंबईच्या रस्त्यांवर माझ्याबद्दल अपमानकारक गोष्टींना प्रोत्साहन दिले. जेव्हा मी बदला घेतला, तेव्हा सोनिया सेनाद्वारे त्यांचा बचाव करण्यात आला आणि त्यांनी त्याबदल्यात माझे घर तोडून टाकले. आज पाहा शिवसेनाने त्यांना बाहेर काढून टाकले. ही शिवसेनेच्या शेवटाची सुरुवात आहे.”
विशेष म्हणजे, नुकतेच परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवले होते. परमबीर यांनी चिट्टीमध्ये लिहिले होते की, सचिन वझे यांनी मला सांगितले होते की, अनिल देशमुख यांनी त्यांच्याकडून दर महिन्याला १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
परमबीर यांनी असा आरोप लावला आहे की, अनिल देशमुख यांनी सचिन वझे यांना अनेक वेळा भेटण्यासाठी घरी बोलावले होते. गृहमंत्र्यांनी वझे यांना निधी देण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर वझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टारगेटही दिले होते.
मात्र, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांचे आरोप खोटे ठरवत मानहानीचा दावा दाखल केल्याचे म्हटले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘इंडियन आयडल’ शोमध्ये सवाई भट्टनंतर सायली कांबळेची गरिबी ठरतेय वादाचा विषय; प्रेक्षकांनी लावला जोरदार टोला
-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो
-अभिमानास्पद! बिग बी’ ठरले ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय