बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. ती देशातील प्रत्येक मुद्द्यावर आपले रोखठोक मते मांडताना दिसते. तिने अनेक बॉलिवूड कलाकारांना टोला लगावल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशातच आता ती पुन्हा एकदा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तरवर निशाना साधल्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच फरीदाबाद येथे निकिता तोमरच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. यामध्ये तौसिफ आणि रेहान यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यासंदर्भातील ट्वीट रिट्विट करत कंगनाने फरहानला जबाबदार ठरवले आहे.
कंगनाने ट्वीट रिट्विट करत म्हटले की, “या मुलांवर हिंसा किंवा गुन्ह्याचा कोणताही रेकॉर्ड नव्हता. मुख्य आरोपीने पोलिसांना सांगितले आहे की, त्याला ‘मिर्झापूर’ वेब सीरिजने त्या मुलीला मारण्याची प्रेरणा मिळाली, जिने त्याला नकार दिला होता.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1374750540945494017
यानंतर तिने पुढे ट्वीटमध्ये फरहानला टॅग करत लिहिले, “प्रिय फरहान अख्तर, अपेक्षा आहे तुला समजेल की, कलेचा किती खोल प्रभाव होतो. अशाप्रकारच्या हत्येमध्ये तुम्हा सर्वांचा खूप मोठा हात आहे. दु:खद.”
खरं तर २६ ऑक्टोबर, २०२० रोजी फरीदाबादच्या वल्लभगडमध्ये निकिता तोमरची गोळी मारून हत्या केली होती. निकिताला वल्लभगडमध्ये तिच्या कॉलेजच्या बाहेरच तौसिफ नावाच्या मुलाने गोळी मारली होती. या घटनेची सीसीटीव्ही फुटेजही समोर आली होती, जी पाहून प्रत्येकाला धक्का बसला. माध्यमांतील वृत्तानुसार, आरोपी तौसीफ मिर्झापूर २ वेब सीरिजमधील पात्र मुन्नाद्वारे प्रभावित झाला होता. त्यामुळे जेव्हा निकिताने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिला गोळी मारली.
कंगना आणि फरहान यांच्यातील ही पहिलीच चर्चा नाहीये. यापूर्वीही कंगना-ऋतिक रोशन वादादरम्यान फरहानने ऋतिकची बाजू घेतली आहे. यावर कंगना आणि तिची बहीण रंगोलीने फरहानवर टीका केली होती.
विशेष म्हणजे, नुकतेच मुंबई दंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्रीविरोधात जामीनपत्र जारी केले होते. जावेद अख्तर यांनी कंगनावर आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुशांतच्या मृत्यूचा धक्का आजही पचवू शकली नाही अंकिता, मुलाखतीत सांगितल्या ‘या’ गोष्टी
-आमिर खाननंतर आता आर माधवनही झाला कोरोना पॉझिटिव्ह, अभिनेत्याने मजेशीर अंदाजात दिली माहिती
-धक्कादायक! रिक्षामध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, दीर्घ काळापासून होता आर्थिक अडचणीत