प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला ‘इमर्जन्सी’ चित्रपट, रिलीज होण्यापूर्वी चित्रपट दाखवण्याची कॉंग्रेसची मागणी

0
74
kangana ranaut
Photo Courtesy: Instagram/ kangana Ranaut

बॉलिवूडची पंगा क्विन कंगणा रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या बहुचर्चित चित्रपटात कंगणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटामधील कंगणाचा लूक समोर आला होता. हुबेहूब इंदिरा गांधींसारखा दिसणारा हा लूक माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. तेव्हापासूनच या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र आता प्रदर्शनाआधीच या चित्रपटावर कॉंग्रेस पक्षाने आपत्ती दर्शवली असून सिनेमागृहात प्रदर्शित होण्याआधी चित्रपट दाखवण्याचीही मागणी केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

कंगणा रणौत ही हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने तसेच बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. सध्या कंगणा तिच्या इमर्जन्सी या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील तिचा फस्टलूक समोर आला होता.

परंतु आता कंगणाच्या या चित्रपटावर कॉंग्रेस पक्षाने आपत्ती दर्शवली आहे. त्याचबरोबर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्याआधी कॉंग्रेस नेत्यांना दाखवण्याचीही मागणी केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार कंगणाचा इमर्जन्सी चित्रपट म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या चित्रपटाला पक्षाने विरोध केला आहे. याबद्दल आता चित्रपट निर्माते काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, इमर्जन्सी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगणा रनौत या चित्रपटाची दिग्दर्शकही आहे.

दरम्यान चित्रपटात अभिनेत्री कंगणा रणौतने इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा मेकअप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –

‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

Mika Di Vohti | शोमधून बाहेर झाली ‘ही’ कंटेस्टंट, मिका सिंगबद्दल केले मोठे खुलासे

करिना कपूरने ‘या’ कलाकारासोबत काम करण्यास दिला होता नकार, सध्या गाजवतोय हिंदी सिनेसृष्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here