Wednesday, June 26, 2024

मिस्ट्री मॅनशी लवकरच लग्न करणाऱ्या कंगनाने आधी केले आहे ‘या’ अभिनेत्यांना डेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. कंगना वादात अडकली नाही, असा एकही प्रसंग नाही. यामुळेच तिला बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हटले जाते. ती अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना पंगा घेण्याची भीती वाटत नाही. इतकंच नाही, तर तिचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असत. दुसरीकडे, सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. कॅटरिना कैफ-विकी कौशल, राजकुमार राव-पत्रलेखा हे देखील लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू असतानाच आता कंगनानेही ती लग्न करणार असल्याचे सांगून सर्वांना हैराण केले आहे.

अलीकडेच कंगनाने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे आणि तिला लवकरच त्याच्याशी लग्न करायचे आहे, असे सांगून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पण ही काही पहिली वेळ नाही जेव्हा ती तिच्या नात्याबद्दल चर्चेत आली आहे. मिस्ट्री मॅनपूर्वी कंगनाने अनेकांना डेट केले आहे. काहींसोबतचे अफेअर लग्नापर्यंत पोहोचले होते. पण शेवटी त्यांचे नाते तुटले. जाणून घ्या, कंगनाच्या हृदयात कोणाकोणाला केलंय डेट.

आदित्य पांचोली
कंगना जेव्हा १७ वर्षांची होती, तेव्हा तिचे नाव अभिनेता आदित्य पांचोलीसोबत जोडले गेले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. माध्यमांतील वृत्तानुसार, या नात्यात तिला शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. कंगनाने त्याच्यावर अनेकदा मारहाणीचा आरोप केला होता. नंतर कंगना या नात्यातून बाहेर आली.

aditya pancholi

अध्ययन सुमन
कंगना आणि अध्ययन सुमन यांनी ‘राझ: द मिस्ट्री कंटिन्यूस’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. शेखर सुमन या दोघांच्या नात्याच्या विरोधात होते आणि त्यांनी मीडियामध्ये कंगनावर अनेक आरोप केले होते. यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. अध्ययन सुमन आणि कंगनाच्या नात्याला १० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

निकोलस लॅफर्टी
कंगनाचे नाव ब्रिटनमधील डॉक्टर निकोलस लॅफर्टी यांच्यासोबतही जोडले गेले आहे. दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. सिमी ग्रेवालच्या शोमध्ये तिने सांगितले की, ती एका २८ वर्षांच्या मुलाला डेट करत आहे आणि ती त्याच्यासोबत लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि ब्रेकअप झाले.

अजय देवगण
कंगना आणि अजय देवगण यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतरही दोघे एकत्र दिसले होते. अजय देवगणनेही कंगनाला चित्रपटात कास्ट करण्याची मागणी सुरू केली होती. पण विवाहित अजय देवगणने या नात्यापासून अंतर ठेवले होते. कंगनाने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, ती चुकून एका विवाहित पुरुषासोबत रिलेशनमध्ये आली होती.

ऋतिक रोशन
‘क्रिश’ या चित्रपटात कंगना आणि ऋतिक एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले. पण कंगनाने ऋतिक आणि ती रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. कंगनाने सांगितले की, तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते आणि तिला लग्न करायचे होते. तर ऋतिकने या गोष्टीला साफ नकार दिला. कोर्टाची नोटीसही कंगनाला पाठवण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा