मुंबई एयरपोर्टवर दोन्ही मुलांसोबत स्पॉट झाले करीना आणि सैफ अली खान, क्यूट जहांगीरने वेधले सर्वांचे लक्ष


कलाकार आणि मीडिया यांचे नाते खूपच जवळचे आहे. हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. इंडस्ट्रीमधल्या मोठमोठ्या कलाकारांवर सतत मीडियाचे कॅमेरे रोखलेले असतात. फोटोग्राफरच्या नजरा आणि कॅमेरे कलाकारांवर टिकून असतात. कलाकार कुठे, कधी, केव्हा, कोणासोबत, कसे जातात या सर्व प्रश्नांची उत्तरं हे मीडियावाले शोधतात आणि जगाला देतात.

सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय, प्रसिद्ध आणि मोठे कपल आहे. त्यांना नेहमीच मीडियामध्ये खूप मान दिला जातो. नुकतेच या दोघांना तैमूर आणि जहांगीर या त्यांच्या मुलांसोबत मुंबई एयरपोर्टवर पाहिले गेले. यावेळी करीना आणि सैफ कॅज्युअल लूकमध्ये दिसले. करिनाने डेनिम शर्ट, जीन्स आणि स्नीकर्स घातले होते तर सैफने काळा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि शूज घातले होते. तैमूरने काळा शर्ट आणि कार्गो पॅन्ट तर जहांगीरने देखील काळ्या रंगाचा टीशर्ट घातलेला दिसला.

करिनाने जहांगीरला कडेवर पकडले होते तर तैमूर सैफसोबत दिसला. यावेळी या चौघांनी मीडियाला फोटो देखील काढू दिले. मात्र हे चौघा नक्की कुठे गेले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. नुकतेच हे चौघं सैफचा मालदीवला वाढदिवस साजरा करून आले आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्या हातात पासपोर्ट दिसत असल्यामुळे ते कदाचित भारताबाहेर गेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नुकताच सैफचा बहुप्रतीक्षित ‘भूत पोलीस’ हा कॉमेडी हॉरर सिनेमा प्रदर्शित झाला असून, चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. तर करीना लवकरच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

सध्या सैफ आणि करीना ट्रोलर्सच्या निशाण्यावर असून, त्यांना त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जहांगीरच्या नावावरून ट्रोल केले जात आहे. याआधी त्यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या तैमूरच्या नावावरून देखील ट्रोल केले गेले होते. करिनाने तिच्या प्रेग्नन्सीच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले असून, ते सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सलमान, शाहरुख अन् आमिर घाबरतात कारण…’, नसिरुद्दीन शाह यांनी साधला तिन्ही खानांवर निशाणा

-‘शिवगामीदेवी’ची भूमिका साकारून मेगास्टार झाल्या रम्या; बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्ससाठी सतत असायच्या चर्चेत

-OMG! यामी गौतमच्या चेहऱ्याची ही काय झाली हालत, पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.