सध्या आपण २१व्या शतकात जगत आहोत. इथे स्त्रियांनी आज अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव कमावले आहे. अशात बॉलिवूडकडे पुढारलेले आणि प्रगत विचार म्हणून पाहिले जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या पुढारलेल्या बॉलिवूडमध्ये देखील काही अपवाद वगळता भुरसटलेल्या विचारांचे देखील लोक होते. यातीलच एक कपूर कुटुंबीय. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते रणधीर कपूर (Randhir kapoor) आणि आता करीना कपूरपर्यंत (Kareena kapoor) अभिनयाचा वारसा असलेल्या या कुटुंबात मुलींना आणि सुनांना अभिनयामध्ये काम करण्यास बंदी होती. परंतु आज हे सर्व पाश मोडत करिश्मा कपूर आणि करीना कपूरने रुपेरी पडदा चांगलाच गाजवला आहे. बेबो (२१ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते.
करीनाचा जन्म मुंबईमध्ये १९ सप्टेंबर १९८० रोजी झाला. कपूर खानदानातील बेबो रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी आहे. तिचे आई आणि वडील दोघांनीही सिनेसृष्टीमध्ये दमदार कामगिरी केली. अशात बेबोला लहानपणापासून रुपेरी पडद्यात बुडालेल्या कुटुंबाकडूनच अभिनयाची गोडी लागली होती. मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेमधून तिने प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर देहरादून येथील गर्ल्स स्कूलमधून तिने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. (Actress Kareena Kapoor Birthday special, know interesting things her life)
लहान वयातच बसला होता मोठा धक्का
बेबो लहान असतानाच तिचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांनी घटस्फोट घेतला. आई बबिता यांनी आपल्या अभिनयाने अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत, तर बाबा रणधीर कपूर यांच्या चित्रपट निर्मितीची तर बातच और आहे! या दोघांनी घटस्फोट घेतला, तेव्हा करीना शालेय शिक्षण पूर्ण करत होती. लहान वयात आई बाबा वेगळे झाल्याने तिने आणि करिश्माने खूप अडचणींचा सामना केला.
वकिलीमध्ये आजमवणार होती नशीब
रुपेरी पडद्यापासून दूर कपूर घराण्यातील मुलींमध्ये करीनाचा देखील नंबर लागणार होता. तिने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकील व्हायचे ठरवले होते. लॉ कॉलेजमध्ये दाखला देखील घेतला होता. परंतु मनामध्ये अभिनयाची खुमखुमी असणारी छम्मक छल्लो तिथे टिकू शकली नाही. तिने देखील आपल्या मोठ्या बहिणीप्रमाणे अभिनय करण्याचे ठरवले. या दोघींना अभिनयात झेप घेण्यासाठी बबिताजींनी विशेष सहकार्य केले. त्यानंतर बेबो सर्वप्रथम झळकली, ती साल २००० मध्ये ‘रेफ्युजी’ या चित्रपटामध्ये. या चित्रपटातूनच तिने रसिक प्रेक्षकांना आणि अभिनयातील अनेक जाणकारांना तिच्यातील अभिनयाची गोडी आणि त्यात पारंगत होण्याची धडपड दाखवून दिली होती. करीनाने ‘यादे’, ‘अजनबी’, ‘अशोका’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘खुशी’, ‘मै प्रेम की दिवानी हु’, ‘लक बाय चान्स’, ‘बिल्लू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून ती कायमच प्रकाश झोतात राहिली.
शाहिद कपूर बरोबर जोडले होते नाव
बेबो अनेक यशस्वी चित्रपट देण्यास सज्ज झाली होती. चित्रपटांसाठी नेमकी कोणती स्टोरी निवडावी याचे तिला चांगलेच ज्ञान मिळाले होते. अशात तिचे नाव शाहिद कपूर बरोबर बराच काळ जोडले गेले. या दोघांचे एकत्र डेट करतानाचे अनेक फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अनेकांना हे दोघे प्रेम संबंधात आहेत असे वाटत होते. साल २००७ मध्ये हे दोघे ‘जब वी मेट’ या चित्रपटामध्ये झळकले. या चित्रपटामध्ये या दोघांच्या प्रेमकहाणीने चाहत्यांची मने जिंकली, पण त्या दोघांचे खऱ्या आयुष्यातील प्रेमाचे जहाज किनाऱ्यावर काही पोहचू शकले नाही.
राकेश रोशन यांना दिला होता डच्चू
दिग्गज निर्माते राकेश रोशन यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी करीनाची निवड केली होती. हा चित्रपट त्यांचा मुलगा ऋतिक रोशनचा प्रथम चित्रपट होता. करीनाने देखील तोपर्यंत चित्रपट सृष्टीत पाय ठेवला नव्हता. त्यामुळे त्यांनी करिना आणि ऋतिकला या चित्रपटामधून लॉन्च करायचे ठरवले. करीनाने यासाठी होकारही दिला. चित्रपटाची शूटिंग सुरु झाली होती. परंतु नंतर बेबोने या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. तिचे असे म्हणणे होते की, चित्रपटामध्ये फक्त हिरोला महत्व दिले जात आहे. हिरोईनच्या भूमिकेवर दुर्लक्ष केले जात आहे. या कारणास्तव तिने हा चित्रपट नाकारला होता. परंतु ‘कहो ना प्यार है’ मध्ये जर हे दोघे एकत्र झळकले असते, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील मोठमोठे विक्रम मोडले असते, असे अनेक चाहते म्हणतात.
रुपेरी पडद्यावर अनेक यशस्वी चित्रपट देऊन तिने अभिनयाच्या कारकिर्दीत स्वतःचे वेगळे नाव तयार केले. तिने ‘हिरोईन’ या चित्रपटामध्ये देखील दमदार भूमिका साकारली होती. सुरुवातीला या चित्रपटाची स्टोरी वाचून तिने नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट ऐश्वर्या रायकडे गेला. परंतु तिने देखील नकार दिल्याने अखेर हा चित्रपट करीनाच्याच पारड्यात पडला. आपल्या दमदार अभिनयासह ती बोल्ड आणि हॉट सिन करण्यास देखील कायमच तयार असायची.
चित्रपटांमध्ये नाव कमवत असताना खान परिवारातील अनेक कलाकारांबरोबर तिने काम केले होते. त्यानंतर ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली. या दोघांच्या जोडीने देखील चित्रपट सृष्टी चांगलीच गाजवली.
या दोघांनी ‘रोडसाईड रोमिओ’, ‘टशन’, ‘एल ओ सी कारगिल’, ‘ओमकारा’, ‘एजंट विनोद’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. साल २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. तैमूर आणि जहांगीर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नाकारून करीना कपूरने केली मोठी चूक, आज होतोय पश्चाताप
क्रिती सेननचा मस्ती मूड! पाहा परदेशवारीचे व्हायरल फोटो
‘या’ भितीने ठोकला अभिनयाला रामराम, ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंगने केला मोठा खुलासा