करीना कपूरने (Kareena kapoor) तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले असले तरी, तिने अनेक चित्रपट नाकारले आहेत. जे नंतर हिट किंवा ब्लॉकबस्टर ठरले आहेत. सर्वप्रथम, कंगना रणौतचे (Kangna ranaut) करिअर घडवणाऱ्या राणीबद्दल बोलूया. तुम्हाला माहीत आहे का की, हा चित्रपट करिनाला पहिल्यांदा ऑफर झाला होता पण तिला स्क्रिप्ट आवडली नाही आणि तिने हा चित्रपट नाकारला. आज करिना तिचा वाढदिवस साजरा करत आहे, चला तर जाणून घेऊया तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादी…
या चित्रपटामुळे कंगनाला अनेक पुरस्कार मिळाले. दुसरीकडे, ‘गोलियों की रासलीला: रामलीला’बद्दल बोलायचे तर, हा चित्रपट पहिल्यांदा करिनाला ऑफर करण्यात आला होता, परंतु तिने तो नाकारला आणि हा चित्रपट दीपिका पदुकोणच्या (Deepika padukone) खात्यात गेला. ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या बाबतीतही असेच घडले जे हिट ठरले.
माध्यमातील हा चित्रपट आधी करिनाला ऑफर करण्यात आला होता पण तारखांच्या समस्येमुळे करिना हा चित्रपट करू शकली नाही आणि दीपिका पदुकोणला मुख्य भूमिका मिळाली. त्याचवेळी प्रियांका चोप्राने (Priyanka chopra) फॅशन या चित्रपटाद्वारे बरीच चर्चेत आणली होती, मात्र तिने साकारलेल्या भूमिकेसाठी करिनाची पहिली पसंती होती, मात्र स्क्रिप्ट आवडली नसल्याचे सांगत तिने हा चित्रपट नाकारला होता.
त्याचप्रमाणे याआधीही ‘दिल धडकने दो’ हा चित्रपटही करिनाला ऑफर करण्यात आला होता. दिग्दर्शिका झोया अख्तर यांना करीना आणि रणबीर कपूर यांना भावंडं म्हणून कास्ट करायचं होतं पण करिनाने हा चित्रपट नाकारला आणि प्रियंका चोप्राने ते केलं. परंतु हे चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर तिला पश्चाताप झाला असावा. कारण सगळेच चित्रपट प्रेक्षकांना आवडले. नुकताच करीनाचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट रिजिझ झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. त्यामुळे तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
–‘राणू आक्कां’च्या वेशात अश्विनी महांगडेचं जबरदस्त फोटोशूट
–अभिनेत्री दिशा पटानीचा लूक पाहून चाहते संतापले; म्हणाले, ‘वेडी झाली आहे…’