Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड बाबो! करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? फोटो बघाच…

बाबो! करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? फोटो बघाच…

‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर नुकतीच लंडनमध्ये असल्याच्या बातम्यांनी लक्ष वेधले होते. करीना पती सैफ अली खान आणि मुलांसोबत लंडन येथे सुट्ट्यांची मजा घेत होती. तिच्यासोबत तिची मैत्रीण अमृता अरोरा आणि बहीण करिश्मा कपूर यादेखील होत्या. मात्र, आता तिच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. करीना तिसऱ्यांदा आई बनणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

करीनाचे बेबी बंप
लंडनमधील बार आणि रस्त्यांवर काढण्यात आलेल्या या फोटोंमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor) हिचे बेबी बंप (Kareena Kapoor Baby Bump) दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणींच्या मध्ये शर्ट किंवा पर्सने तिचे बेबी बंप लपवत पोझ देत आहे, जेणेकरून कोणाचेही लक्ष तिच्या बेबी बंपकडे जाणार नाही.

यामधील काही फोटो हे नीतू कपूर यांच्या वाढदिवसादरम्यानचेही आहेत. इथे सैफ अली खानच्या बाजूला उभी राहून करीना पोझ देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54))

सैफ- करीना तिसऱ्यांदा बनणार आई-बाप?
करीनापूर्वी सैफ अली खान (Saif Ali Khan) याने अमृता सिंगसोबत लग्न केले होते. अमृताकडून त्याला सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) हे अपत्य आहेत. दोघेही अगदी आई-वडिलांसारखेच दिसतात. दुसरीकडे, करीना कपूर खान हिच्याकडून सैफला आधी तैमूर अली खान आणि त्यानंतर जेह अली खान याच्यानंतर आणखी एक आनंदाची बातमी येणार असल्याचे बोलले जात आहे. एकूणच सैफचे हे पाचवे अपत्य असेल.

करीना कपूर पाच वर्षांमध्ये तिसऱ्यांदा बनणार आई
करीना कपूरनेही या बातमीला दुजोरा दिला, तर ती २०१६मध्ये तैमूर, २०२१ मध्ये जेह आणि त्यानंतर २०२२ मध्ये तिसऱ्यांदा आई बनले. करीना सध्या ४१ वर्षांची आहे, तर सैफ अली खान ५१ वर्षांचा आहे. करीना आणि सैफ दोघेही त्यांच्या कामामुळे जितके चर्चेत नसतात, तितके त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि खासकरून त्यांच्या मुलांमुळे चर्चेत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दिवसेंदिवस वाढत चाललाय मौनी रॉयचा बोल्डनेस, पतीसोबतचा खासगी फोटो शेअर करत केले नेटकऱ्यांना घायाळ

चिरंजीवी, राजामौली अन् नागार्जुन यांनी गायले ‘लाल सिंग चड्ढा’चे गोडवे, आमिरला थिएटरमध्येच अश्रू अनावर

विश्वासच बसेना! सुष्मिता- ललित मोदींचे नाते आख्ख्या जगाला समजले, पण अभिनेत्रीने वडिलांनाच ठेवले अंधारात

हे देखील वाचा