‘बेबो’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान होय. सिनेमांचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या करीनाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यही शानदार पद्धतीने एन्जॉय करते. नुकतेच ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या अफवांमुळे चर्चेत आली होती. मात्र, तिने सोशल मीडियावरून स्पष्ट केले की, ती तिसऱ्यांदा आई बनणार नाहीये. अशात तिने यावर मोकळेपणाने चर्चा केली आहे. तिने म्हटले आहे की, कलाकारांना आणि अभिनेत्रींना सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.
करीनाचा वास्तविकतेवर विश्वास
माध्यमांशी बोलताना करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) म्हणाली की, “मी इंस्टाग्रामवर आहे. इथे आम्ही आमचे स्वत:चे फोटो शेअर करतो. मी माझ्या अधिकृत पेजला कोणत्याही फिल्टरशिवाय म्हणजेच वास्तविक ठेवण्यास पसंत करते. तसेच, याची मजाही लुटते. मी यामध्ये माझे छोटेसे कुटुंब पाहते आणि यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.” तसेच, ती पुढे म्हणाली की, मी एक खासगी व्यक्ती आहे आणि तेच करत आहे, जेवढं मी करू शकते.
पिझ्झा खाण्याबद्दल माही मोजमाप
नुकतीच ज्या फोटोवरून करीनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगल्या, त्यावरही तिने चर्चा केली. ती म्हणाली की, “मी ४० दिवसांच्या सुट्टीवर होते. कुटुंबासोबत या ४० दिवसांमध्ये मी किती पिझ्झा खाल्ले होते, हेच मला आठवत नाही. मला स्वत:लाच समजून सांगावे लागले की, ‘चिल, ठीक आहे, आपणही माणूसच आहोत.'”
‘मी काय मशीन आहे? निर्णय माझ्यावर सोडून द्या’
करीनाला जेव्हा विचारण्यात आले की, महिलांचं वजन वाढू लागते, तेव्हा लोकांच्या डोक्यात पहिले हे येतं की, ती प्रेग्नंट आहे, तुम्ही याच्याशी सहमत आहात का? याचे उत्तर देताना ती म्हणाली की, “तुम्हाला काय म्हणायचंय, मी प्रेग्नंट आहे? मी पुन्हा मुलं जन्माला घालत आहे का? मी काय मशीन आहे का? निर्णय माझ्यावर सोडून द्या.” तिने या सर्व प्रश्नांची उत्तरे हिंदुस्तान टाईम्स या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली आहेत.
यावेळी करीनाने सर्वांना आपल्या मतानुसार जीवन जगण्याचा अधिकार असल्याचेही म्हटले आहे. करीना ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत आमिर खान दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये बिपाशाच्या लेटेस्ट पोस्टवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटोमध्ये काय आहे खास?
भोजपुरी स्टारवर भारी पडला आकांक्षा दुबेचा ठुमका, पाहणारे पाहतच राहिले
सलमान खानच्या जीवाला धोका? गन लायसन आणि आता बुलेटप्रूफ गाडीची व्यवस्था