Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड ‘ती मोठ्या घरची पोरगीये आणि खतरनाक…’, करीनाबद्दल अक्षयने का दिली होती सैफला चेतावणी?

‘ती मोठ्या घरची पोरगीये आणि खतरनाक…’, करीनाबद्दल अक्षयने का दिली होती सैफला चेतावणी?

‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही अलीकडे जास्त चित्रपटात दिसून येत नाही. मात्र, तरीही ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. इतकेच नाही, तर ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय बनते. मीडियासमोर ती अशा काही गोष्टी करते, ज्यामुळे ती लाईमलाईटमध्ये येते. आता अजून एका गोष्टीचा खुलासा तिने केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने आपल्या प्रेम कहाणीबद्दल खूप वेळा सांगितले आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचेदेखील नाव येते. करीना ही नुकतीच अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या (Twinkle Khanna) ‘ट्वीक इंडिया’ या शोचा हिस्सा बनली होती. जिथे करीनाने आपल्या करियर, अफेअर्स, ब्रेकअप, लग्न आणि मुलं यांबदल सांगितले होते. बोलता बोलता करीना तिच्या आणि सैफच्या प्रेम कहाणीबद्दल बोलली. यादरम्यान तिला त्यांच्या डेटिंगचे दिवस आठवू लागले.

तिने सांगितले की, “‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही म्हणजे मी सैफ आणि अक्षय सोबतच काम करत होतो. तेव्हाच अक्षयला माझ्यावर आणि सैफवर थोडा संशय आला होता की या दोघात काहीतरी शिजतंय. दरम्यान त्याने सैफला बाजूला घेऊन सांगितले की, थोडं जपून राहा ही मोठ्या घरची पोरगी आहे आणि थोडी खतरनाक आहे. मी तिला ओळखतो तू सावध राहा.”

करीनाच्या या बोलण्यावर ट्विंकल खन्ना म्हणाली की, “हा सल्ला चांगला होता.” या गोष्टीवर करीना म्हणाली की, अक्षयने सैफला बरोबर सांगितलं होतं. त्यावर सैफ म्हणाला होता की, “मी करीनाला ओळखतो आणि मी तिला चांगलं सांभाळून घेईल.”

हेही पाहा- बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

जर तुम्हाला माहित नसेल तर ‘ट्वीक इंडिया’ हे युट्यूबवरील एक चॅनेल आहे, ज्यावर ट्विंकल खन्ना कलाकारांची मुलाखत घेत असते. करीना कपूर आणि सैफ अली खान हे दोघेही ‘टशन’ या चित्रपटादरम्यान जवळ आले होते. त्यांचा हा चित्रपट २००८ मध्य प्रदर्शित झाला होता. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. आता त्यांना दोन लहान मुलेही आहेत. तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नावे आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा