Friday, July 5, 2024

सैफ-करीना तैमूरला टाकणार बोर्डिंगमध्ये? ‘बेबो’ने शेअर केला लंडनमधील ‘तो’ फोटो

‘बेबो’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान होय. करीना सध्या तिचा पती सैफ अली खान आणि तैमूर- जेह या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवत आहे. करीना तिच्या सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही तुफान सक्रिय असते. तिने या ट्रिपच्या आठवणी फोटोमध्ये कैद करून चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींप्रमाणे करीना कपूर हीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. अशात तिने नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये सैफ अली खान आणि त्याचा मोठा मुलगा तैमूरही दिसत आहे. विशेष म्हणजे, तैमूरसोबत त्याच्या आजोबांचीही झलक दाखवली आहे.

हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वडील, गॉडफादर, मुलगा, विनचेस्टर २०२२.” हा फोटो विनचेस्टर बोर्डिंग शाळेतील आहे. या फोटोला आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे.

चित्रात, प्रत्येकजण विनचेस्टर कॉलेजच्या ६०० वर्षे जुन्या बोर्डाच्या कॉरिडॉरमध्ये चालत आहे. सैफ निळ्या रंगाचा शर्ट, हाफ स्वेटर, डेनिम आणि कॅपमध्ये दिसत आहे, तर तैमूरने हुडी आणि डेनिम्स घातले आहेत. करीनाच्या या पोस्टवर तैमूरची आत्या सबा पतौडी हिने कमेंट करत “माशा अल्लाह, अद्भुत क्षण!,” असे लिहिले आहे. यासोबतच चाहते लव्ह इमोजी कमेंट करत आहेत.

याआधीही करीनाने तिच्या गर्ल गँगसोबतचे फोटो शेअर केले होते. करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि नताशा पूनावाला यांच्यासोबतचा करिनाचा फोटो पाहून सर्वांना ‘सेक्स अँड द सिटी’चा सीन आठवला होता.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर करीना कपूर आमिर खान (Aamir Khan) याच्यासोबत ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मलायका अरोराचा ४८ व्या वर्षी साडीत जलवा; चाहते म्हणाले, ‘२१ वर्षाची दिसतीयेस’

कधीकाळी दीर इमरान हाश्मीसोबत दिले होते बोल्ड सीन्स, आता दिसतेय अशी की, ओळखणेही झाले कठीण

छोटी परीही रमली विठ्ठल भक्तीत! क्यूट व्हिडिओ शेअर करत म्हणतेय, ‘सुखी ठेव मित्रांना’

हे देखील वाचा