Thursday, March 28, 2024

कधीकाळी दीर इमरान हाश्मीसोबत दिले होते बोल्ड सीन्स, आता दिसतेय अशी की, ओळखणेही झाले कठीण

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी सिनेमात बोल्ड आणि इंटीमेट सीन देऊन अफाट लोकप्रियता मिळवली. मात्र, नंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्या. त्यामुळे त्या आता कशा दिसतात हेदेखील कदाचित चाहत्यांना माहिती नसते. अशीच अभिनेत्री आहे ती म्हणजे उदिता गोस्वामी होय. उदिताने अभिनेता इमरान हाश्मी याच्यासोबत खूप बोल्ड सीन्स दिले होते. मात्र, तिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. रुपेरी पडद्यावर बोल्ड दिसणारी उदिता खऱ्या आयुष्यात खूपच बदलली आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसत नाहीये की, हीच ती उदिता आहे, जी बोल्ड अदांनी चाहत्यांच्या काळजात घंटी वाजवायची. मात्र, आजही तिचे सिनेमे प्रेक्षकांना खूप आवडतात.

इमरान हाश्मीसोबतच्या जोडीला मिळाली चाहत्यांची पसंती
अभिनेत्री उदिता गोस्वामी (Udita Goswami) हिने जेमतेम १५ सिनेमात काम केले आहे. मात्र, एवढ्यातही तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. उदिताने इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याच्यासोबत ‘जहर’ आणि ‘अक्सर’ यांसारख्या सिनेमात काम केले होते. याव्यतिरिक्त तिने ‘पाप’ या सिनेमातही जॉन अब्राहम याच्यासोबत बोल्ड सीन्स दिले होते. या सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीला खूप वाहवा मिळाली होती. उदिताने पुढे जाऊन लग्नही केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.

उदिताने दिग्दर्शक मोहित यांच्याशी थाटला संसार
डेहराडूनमध्ये जन्मलेली उदिता गोस्वामी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील राहिली आहे. जाणून आश्चर्य वाटेल की, तिचे वडील बनारसचे आहेत आणि आई शिलाँगची आहे. उदिताने भलेही अभिनेत्यांसोबत सिनेमात बोल्ड भूमिका केल्या असतील, पण खऱ्या आयुष्यात तिच्या अफेअरची चर्चा दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांच्यासोबत सुरू झाली. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २०१३मध्ये मोहितसोबत लग्न केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami)

अभिनेत्रीने केली होती पतीची हेरगिरी
खरं तर, उदिता हिचा भट्ट कुटुंबाशी नाते आहे. उदिता आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची नात्याने वहिनी लागते. तसेच, इमरान हाश्मी तिचा दीर लागतो. मात्र, २०१४मध्ये तिने आपला पती मोहित सूरीची कथित कॉलची माहिती काढण्यामुळे चर्चेत आली होती. यावर चांगलाच वाद झाला होता. मात्र, या घटनेचा उदिता आणि मोहितच्या नात्यावर कोणताही फरक पडला नाही.

हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी आहे. मोहित आणि उदिता यांना दोन मुलेही आहेत. त्यांची नावे देवी सूरी आणि कर्मा सूरी असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कोल्हापूरमधील जोडप्यासाठी ‘वाय’ सिनेमा ठरला प्रेरणादायी, डायरेक्ट थिएटरमध्येच उरकलं बारसं

कसं जुळलं रे यांचं! पाहा बॉलिवूड कलाकारांनी आपल्या जोडीदारापुढे कशाप्रकारे व्यक्त केलं आपलं प्रेम

पधारो म्हारे देस! लंडनहून बेबी बंपसह मुंबईत परतली आलिया, रणबीरला पाहताच मारली कडकडीत मिठी

हे देखील वाचा