Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड करीनाने जाेया अख्तरचा केला अपमान; म्हणाली, ‘तू बनू नाही शकत डायरेक्टर’ शाहरूखने घेतला पुढाकार

करीनाने जाेया अख्तरचा केला अपमान; म्हणाली, ‘तू बनू नाही शकत डायरेक्टर’ शाहरूखने घेतला पुढाकार

बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री करीना कपूर ही स्पष्टवक्तेपणाबद्दल ओळखली जाते. पार्टी असो किंवा पत्रकार परिषद, करीना सर्वांसमोर न डगमगता तिचे मत मांडते. कधी करीना तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच इंडस्ट्रीतील करीनाची चांगली मैत्रीण आणि दिग्दर्शक जाेया अख्तर हिने  तिच्या सवयीशी संबंधित एक खुलासा केला आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये, झोया अख्तर (zoya akhtar) हिने खुलासा केला की, “शाहरुख खानच्या पार्टीत चित्रपटांच्या निवडीवरून माझा आणि करीनाचा जोरदार वाद झाला होता. छोट्याशा चर्चेने सुरू झालेली गोष्ट इतकी मोठी झाली की, किंग खानला सर्व काही सोडून आमच्या भांडणाचा ताेडगा काढावा लागला.”

या चित्रपटाबाबत झोया आणि करीना यांच्यात झाला होता वाद 
झोया अख्तरने सांगितले की, “अनेक वर्षांपूर्वी तिचा करीनासोबत एका चित्रपटावरून वाद झाला होता.” शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये बी टाऊनचे जवळपास सर्व स्टार्स पोहोचले होते. या पार्टीत करीना आणि झोयाही आल्या होत्या. मस्ती करताना अचानक दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांची चर्चा सुरू झाली आणि त्याचदरम्यान करीनाने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा उल्लेख केला. तिने झोयाला विचारले की, “तिला हा चित्रपट आवडला का?”, त्यावर झोयाने म्हटले ‘हो’. यानंतर करीनाने विचारले की, “शाहरुख आणि काजोल या चित्रपटात ज्याप्रमाणे ट्रेनच्या मागे धावले त्याप्रमाणे तु कधी धावेली आहे का?” उत्तरात झोया म्हणाली ‘नाही’. जेव्हा करीनाने विचारले की, “ती डीडीएलजेला बॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानते का?” यावर झोयाने उत्तर दिले ‘नाही’. येथूनच दाेघींमध्ये वाद सुरू झाला.

डीडीएलजेला सर्वोत्कृष्ट चित्रपट न मानल्याबद्दल करीना कपूर (kareena kapoor) संतापली होती. तिने झोयाला रागाने सांगितले की, “ती कधीही चांगली दिग्दर्शक बनू शकणार नाही.” हे ऐकताच झोया आणि करीना यांच्यात वाद सुरू झाला. दोघांमधील वाद इतका वाढला की, शाहरुखला मध्ये यावे लागले. झोया म्हणाली की, “तिला करीना खूप आवडते, पण त्यावेळी ही गोष्ट फार विचित्र वाटली.”

या चित्रपटांचे दिग्दर्शन केले झोयाने 
झोया अख्तर ही जावेद अख्तरची मुलगी आणि फरहान अख्तरची बहीण आहे. तिने ‘लव्ह बाय चान्स’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘गली बॉय’ या सारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उर्फीच्या पार्टीमध्ये पाेहचला एक्स बाॅयफ्रेंड,अभिनेत्रीने शेअर केली भन्नाट पाेस्ट

‘बेवफा तुझको मैं बदनाम…’, नीलकमल सिंगची नवीन गजल रिलीज, तुम्ही पाहिली का?

हे देखील वाचा