Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड ‘या’ भूमिकेसाठी करीना कपूरने १२ कोटी घेतले? पहिल्यांदाच अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

‘या’ भूमिकेसाठी करीना कपूरने १२ कोटी घेतले? पहिल्यांदाच अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor)  तिच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत (Aamir Khan) मुख्य दिसणार आहे. हे दोन्ही कलाकार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. एका मुलाखतीदरम्यान, करिनाने पहिल्यांदाच सीता: द इनकार्नेशन या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल आणि फीबद्दल उघडपणे बोलली आहे.

‘सीता द इनकारनेशन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी करीना कपूरने मोठ्या रक्कमेची मागणी केल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. या बातम्यांना पूर्णविराम देत अभिनेत्रीने सत्य उघड केले आहे. ही बातमी काही दिवसापूर्वी उघडकीस आली की करीना कपूर पडद्यावर ‘सीता’ च्या भूमिकेमध्ये दिसू शकते. असे म्हटले जात होते की ब्लॉकबस्टर सिनेमा बहुबलीचे लेखक के.वि.विजययंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाच्या मोठ्या स्तरावर चित्रीकरण करण्याची आणि देशातील ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्याची योजना आखली आहे.

त्याचवेळी, असेही अहवाल देण्यात आले होते ज्यात असे म्हटले गेले होते की, करीनाने चित्रपट निर्मात्यांकडून हे पात्र साकारण्यासाठी १२ कोटी रुपये मागितले आहेत. यामुळे त्यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागलत आहे. त्याचवेळी, करीनाने या सर्व अफवा नाकारल्या आहेत आणि सांगितले की तिला या चित्रपटाची कधीही ऑफर देण्यात आली नव्हती. करीना म्हणाली की, मी कधीच स्पष्ट केले नाही कारण मला ही भूमिका कधीच ऑफर झाली नव्हती. लोकांनी मला या वादात का आणले ते मला कळत नाही. हे पूर्णपणे खोटे आहे. या प्रकारच्या चित्रपटाबद्दल मला कधीच माहिती मिळाली नाही. बॉलीवूडमध्ये माझ्यापेक्षा चांगल्या अभिनेत्री या भूमिकेमध्ये बसतील.

करीना पुढे म्हणते की, “मला कोणाचाही अपमान करायचा नाही, कारण प्रत्येकाला गोष्टी करायला आवडते ते मी असो की कोणी दुसरे”. आता या गोष्टींची सवय झाली आहे. आज १०० प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथून वेगवेगळ्या बातम्या येतात, त्यामुळे आपण आपले काम केले पाहिजे किंवा आपण प्रत्येकवेळी ट्विट करताना स्पष्ट केले पाहिजे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा हॉलिवूड चित्रपट “फॉरेस्ट गम्पचा” हिंदी रिमेक आहे, जो ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

‘तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलीय का?’ शेवटी अमृता फडणवीसांनी खुलासा केलाच

‘लोकमान्य टिळकांचे रत्नागिरीतील जन्मस्थळ काल्पनिक’, अभिनेते शरद पोंक्षे यांचा दावा

प्रेमासाठी काहीही ! समाजाच्या मर्यादा तोडून ‘या’ टेलिव्हिजन कलाकारांनी केले आंतरधर्मीय विवाह

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा