Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये काम करण्यासाठी करीना कपूरने थेट रोहित शेट्टीला केला होता फोन, दिग्दर्शकाचा खुलासा

‘सिंघम रिटर्न्स’मध्ये काम करण्यासाठी करीना कपूरने थेट रोहित शेट्टीला केला होता फोन, दिग्दर्शकाचा खुलासा

बॉलिवूड विश्वात अनेक कलाकार आणि निर्माते सतत कोणते ना खुलासे करत असतात. मग ते चित्रपटांबाबत असतात किंवा त्यातील वेगवेगळ्या सीनबद्दल. आता नुकताच बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने खुलासा केला आहे की, ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट बनवताना अभिनेत्री करीना कपूरने त्याला फोन केला आणि या चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले. रोहित शेट्टीने करीना कपूर खानला या चित्रपटात का यायचे होते हे देखील सांगितले.

विशेष म्हणजे ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या ऍक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले होते. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत होता आणि हा ‘सिंघम’चा सिक्वेल होता. रोहित शेट्टीने याआधी २०११ मध्ये ‘सिंघम’ हा चित्रपट बनवला होता, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट मल्याळम चित्रपट ‘एकलव्यन’ (१९९३) पासून प्रेरित होता. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीनाही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात अजय देवगण डीसीपी बाजीराव सिंघमच्या भूमिकेत होता आणि करीनाने अवनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनुपम खेर आणि एजाज खान यांच्याही भूमिका होत्या.

रोहित शेट्टीने त्याच्या मुलाखतीत म्हटले आहे की, “मी आणि करीना ‘गोलमाल २’ मध्ये एकत्र काम केले होते. जेव्हा मी ‘सिंघम २’चे चित्रीकरण करत होतो, तेव्हा तिने मला कॉल केला आणि मी पुढे काय करत आहे ते विचारले.” रोहित शेट्टीने सांगितले की, करीनाने विचारले होते, “तू पुढे काय करत आहेस? ” यावर त्याने करीनाला सांगितले की, तो ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट करत आहे.

यावर करीनाने त्याला विचारले की, “चित्रपटातील मुलगी कोण आहे? मी चित्रपट करत आहे.” रोहित शेट्टीने आपल्या मुलाखतीत सांगितले की, त्याने करीना कपूरला सांगितले की, चित्रपटातील स्त्री पात्राची भूमिका तितकी मोठी नाही. यावर करीना कपूर म्हणाली की, “हे माझ्याबद्दल नाही. मला फक्त टीमसोबत वेळ घालवायचा आहे आणि चित्रपटात यायचे आहे.”

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा पोलीस ऍक्शन ड्रामा चित्रपट ‘सूर्यवंशी’ने अवघ्या दहा दिवसांत १५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्याचे खूप कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार रावची पत्नी पत्रलेखाविषयी या १० गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? वाचा

-‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

-अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

हे देखील वाचा