Sunday, June 2, 2024

क्या बात है! विकी-कॅटरिनाच्या लग्नाला अंबानी कुटुंब लावणार हजेरी? ओबेरॉय हॉटेलमध्ये ५ खोल्याही आरक्षित

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाबाबत, लग्नातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मंगळवारी (०७ डिसेंबर) मेहंदी समारंभानंतर या जोडप्याचा बुधवारी (०८ डिसेंबर) हळदी समारंभ तसेच आफ्टर पार्टी झाली. त्याचबरोबर लग्नासाठी येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांचीही प्रक्रिया सुरू आहे. विकी-कॅटरिनाच्या लग्नात अंबानी कुटुंबही पाहुणे बनू शकते, असे सांगितले जात आहे.

बुधवारी या जोडप्याचा सकाळी हळदी समारंभ पार पडला असून, आफ्टर पार्टी झाली आहे. मंगळवारी नेहा धुपिया, अंगद बेदी, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर आणि अभिनेत्री शर्वरी बाग सिक्स सेन्समध्ये पोहोचले होते. त्याचवेळी, विकी-कॅटरिनाच्या लग्नात अंबानी कुटुंबही सहभागी होऊ शकते, असे बोलले जात आहे. ओबेरॉय हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी ५ खोल्याही आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लग्नात विराट-अनुष्कासोबत अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटीही येऊ शकतात. त्याचबरोबर लग्नात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. सुरक्षा कोडशिवाय प्रवेश दिला जात नाही.

गुरुवारी (०९ डिसेंबर) कॅटरिना आणि विकी सात फेरे घेणार आहेत. ९ डिसेंबरला दुपारी फेटा बांधल्यानंतर कॅटरिना आणि विकी सात फेरे घेतील. यानंतर डिनर आणि पूल पार्टी होईल. मंगळवारी मेहंदी सोहळा पार पडला. माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी आणि कॅटरिनाचा मेहंदी सोहळा कोर्टीन रेस्टॉरंटच्या अंगणात पार पडला. या ठिकाणची सजावट विशेष होती आणि पिवळी थीम ठेवण्यात आली होती. विकी आणि कॅटरिनाची मेहंदी एकत्र झाली. यादरम्यान विकीने मरून रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर कॅटरिनाने गुलाबी फ्लॉवर डिझाइनसह मरून रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

तब्बल ४०० मेहंदी कोन केले होते ऑर्डर
माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी- कॅटरिनाच्या मेहंदीसाठी सोजतकडून ऑर्गेनिक मेहंदी मागवण्यात आली होती. सुमारे ४०० मेहंदी कोन ऑर्डर केले होते. नॅचरल हर्बल मेहंदी फर्मच्या मालकाने माध्यमांना सांगितले की, “लग्नाच्या कार्यक्रमासाठी आम्ही इव्हेंट मॅनेजमेंटला ऑरगॅनिक मेहंदी पुरवली आहे. ही मेहंदी आम्ही सोजतकडून भेट म्हणून मोफत दिली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, लग्नासाठी ऑरगॅनिक मेहंदी बनवण्यासाठी सुमारे २० दिवस लागतात.

हेही वाचा-

हे देखील वाचा