Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा

कॅटरिनाचा मोठा गौप्यस्फोट! पार्टनरचा फोन करायची चेक, दिवाळी पार्टीत पब्लिक बाथरूममध्ये फोडलेला हंबरडा

आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाणे आणि तिथली सुपरस्टार अभिनेत्री बनणे, ही सोपी गोष्ट नाहीये. भारतातील काही अभिनेत्रींनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. त्यात प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होतो. मात्र, परदेशातून येऊन भारतात हिट होणाऱ्या अभिनेत्रींमध्ये कॅटरिना कैफ हिचादेखील समावेश आहे. कॅटरिना विकी कौशल याच्यासोबत लग्न करून वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा तिचे नाव बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्ससोबत जोडले गेले होते. त्यात सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. ती रणबीरवर मोकळेपणाने प्रेम व्यक्त करायची. अशात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कॅटरिना कैफे खुलासा केला आहे. यामध्ये तिने काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिने ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) निमित्त मिनी माथुर आणि दिग्दर्शिका करिश्मा कोहली यांच्यासोबत ‘नेव्हर हॅव्ह आय एव्हर’ हा खेळ खेळला. यामध्ये तिने तिच्या व्हॅलेंटाईन डेच्या प्लॅनविषयी काहीच सांगितले नाही, पण मैत्रिणींसोबत मजेदार गेम खेळला.

कॅटरिनाच्या मेकअप ब्रँड ‘के ब्यूटी’ पेजवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये खेळादरम्यान तिघी जेव्हा कोणताही खुलासा करतात, तेव्हा प्रत्येक वेळी चमचा भरून केक खातात. खेळाच्या रूपात जेव्हा तिघींसमोर प्रश्न येतो की, त्यांनी कधी त्यांच्या पार्टनरचा फोन चेक केला आहे?, तेव्हा कॅटरिना हे मान्य करते की, तिने असे केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kay Beauty By Katrina (@kaybykatrina)

मिनी म्हणते की, विकी तुझ्या फोनचा पासवर्ड बदलतो, पण कॅटरिना म्हणते की, “नाही, मी माझ्या बालिशपणाच्या दिवसात केले होते. आता मी आधीपेक्षा जास्त समजदार आहे. मी असे कधीच करणार नाही. जर कुणी माझ्या बाजूला फोन ठेवून गेला, तरीही मी तो पाहणार नाही.” या उत्तरासोबत कॅटरिना चमचा भरून केक खाऊन घेते.

कॅटरिनाने शूटिंगवेळी दिलेले दुखापतीचे निमित्त
मिनी माथुर हिचे लग्न कबीर खान यांच्यासोबत झाले आहे. ती केक खात नाही, परंतु कॅटरिनाला वचन देते की, तीदेखील असे कधीच करणार नाही. कॅटरिनाने हेदेखील मान्य केले की, एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने दुखापतीचे निमित्तही दिले होते. तिने सांगितले की, जेव्हा ती 2009मध्ये न्यूयॉर्कमध्ये सिनेमाची शूटिंग करत होती, तेव्हा पायाला दुखापत झाल्याचे कारण सांगितले होते. मिनीने सांगितले की, ती अनेकदा अशाप्रकारची कारणं देत असते, जेणेकरून विमानतळावर तिला स्वत:ला सामान उचलून घ्यावे लागणार नाही.

सार्वजनिक बाथरूममध्ये रडली होती कॅटरिना
यादरम्यान तिन्ही कलाकारांनी हे मान्य केले की, ते स्वत:ला गुगलवर सर्च करतात. दुसऱ्या लोकांच्या प्रोफाईल तपासण्याच्या प्रश्नावर कॅटरिना मिनीची थट्टा उडवत म्हणते की, लग्नानंतरही ती इंस्टाग्रामवर लोकांच्या प्रोफाईल चेक करते. मिनीने मान्य केले की, जॉर्ज क्लूनी यांची प्रोफाईल चेक करते. कॅटरिनाने एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, दिवाळी पार्टीवेळी सार्वजनिक बाथरूममध्ये रडली होती. 39 वर्षीय कॅटरिना येत्या काळात श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमात विजय सेतुपती याच्यासोबत दिसणार आहे. हा सिनेमा वर्षाकाठी प्रदर्शित होईल. याव्यतिरिक्त, ती सलमान खान याच्यासोबत ‘टायगर 3’चादेखील भाग आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार
बबिताच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागले होते रणधीर कपूर, वेगळे राहूनही ‘या’ कारणाने घेतला नाही आजही घटस्फोट

हे देखील वाचा