मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला होता. फक्त कार्यक्रमात एकत्र दिसणारे हे जोडपे आता एक बंधनात अडकल्याने त्यांच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला. चाहत्यांनी त्यांची जोडी खूप आवडते. हे दोघेही बॉलिवूडच्या रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. अशात कॅटरिनाने यावर्षी तिचा पहिला करवाचौथ साजरा केला. लग्नानंतर आपल्या आयुष्याबद्दल कॅटरिना पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली. यावेळी तिने विकीबद्दलही गोष्टी सांगितल्या. यादरम्यान तिने केलेला खुलासा सर्वत्र चर्चेत आहे.
अभिनेत्री कॅटरिना कैफ (Actress Katrina Kaif) ही ‘फोन भूत’ या सिनेमात झळकणार आहे. तिचा हा आगामी सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी ती आपल्या संपूर्ण टीमसोबत चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी प्रमोशनदरम्यान कॅटरिनाला तिच्या खासगी आयुष्य आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने बेधडकपणे प्रश्नांची उत्तरे दिली.
View this post on Instagram
कॅटरिनाला विचारण्यात आले होते की, “लग्नानंतर तिच्या आयुष्यात काही बदल झाले आहेत का?” या प्रश्नाचे उत्तर देताना कॅटरिनाने तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, “लग्न सर्वांच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येत असते. तुम्ही तुमचे आयुष्या व्यक्तीसोबत वाटत असता. तसेच, त्यांच्यासोबत राहता. हा खूपच चांगला प्रवास आहे, खूप खूप शानदार.”
“आम्ही अधिकतर शूटिंगसाठी बाहेर असतो. मला वाटते की, प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्यात असेच होते. आम्हाला खूप प्रवास करावा लागतो, त्यामुळे आम्हाला एकमेकांसोबत घालवण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो. मात्र, तो खूप चांगला व्यक्ती आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीचे माझ्या आयुष्यात असणे खूप चांगले आहे,” असेही पुढे बोलताना अभिनेत्री कॅटरिना म्हणाली.
View this post on Instagram
कॅटरिना आणि विकीचे आगामी सिनेमे
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न झाले असले, तरीही ते दोघेही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात खूपच व्यस्त आहेत. कॅटरिना ‘फोन भूत’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. तसेच, विकीबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘गोविंदा मेरा नाम’, ‘सॅम बहादूर’ आणि लक्ष्मण उत्तेकर यांच्या नाव निश्चित नसलेल्या एका सिनेमात झळकणार आहे. या दोघांचेही चाहते त्यांच्या सिनेमासाठी खूपच उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! ‘तारक मेहता…’मधील दयाबेन ‘या’ घातक आजाराशी देतेय झुंज, चाहत्यांना लागलीय काळजी
अखेर ‘बिग बॉस मराठी’च्या आवाजामागील खरा चेहरा समोर आलाच, जाणून घ्या कोण आहे तो