Sunday, April 14, 2024

रिचा अन् अलीच्या लग्नासाठी विकी कौशलच्या हटके शुभेच्छा, भन्नाट कॅप्शन भलतंच चर्चेत

अनेक दिवसांपासून रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली असून त्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर दररोज त्यांच्या लग्नाशी संबंधित फोटो व्हायरल होत असतात. मेहंदीपासून ते पत्रिकेपर्यंत अनेक फोटो व्हायरल होत असतात. मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करणारं जोडपं लग्न बंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीदेखील खूपच खुश आहेत. ते या जोडप्यांना शुभेच्छा देत आहे. मात्र, या सगळ्यांमध्ये विकी कौशलच्या शुभेच्छांनी लक्ष वेधले आहे.

रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोंना चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी त्यांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांसोबत काम केले आहे, त्यामुळे सगळेच त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, त्यामुळे खूपच आलिशान पद्धतीने या जोडप्याचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

रिचा चड्ढा आणि विकी कौशल (Vicky Kaushal) या दोघांनी ‘मसान’ (Masaan) या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान त्यांची चांगलीच मैत्री झाली होती. विकीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या जोडप्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे, आणि सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दोन अद्भूत लोक एकत्र येत आहेत. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आणि खूप सारे प्रेम.” अशा शुभेच्छा देत त्यानेे रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या जोडीचे कौतुक केले आहे. विकीची ही सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

Vicky-Kaushal-Insta-Story
Photo Courtesy: Instagram/vickykaushal09

रिचाने शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) दिवशी नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये रिचाने गुलाबी रंगाचा घागरा घातला होता आणि अली फजलने इवारी शेरवानी घातली होती. या फोटोंमध्ये ते दोघे एमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहेत. ते दोघेही या फोटोत चांगले दिसत आहेत. रिचाने हे फोटो शेअर करत ‘#RiAli मोहब्बत मुबारक’ हे सुंदर कॅप्शन दिले होते. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांनीही यांच्या जोडीला भरभरुन प्रेम दिले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! ब्रेकअप होऊनही रश्मिका मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा, स्वत:च केला खुलासा
‘तुम्ही चिरंजीवी आणि रामसाठी माझे प्रेम विकत घेऊ शकत नाही’, पैसे ऑफर करणाऱ्या निर्मात्यावर भडकला सलमान

हे देखील वाचा