Friday, April 4, 2025
Home बॉलीवूड कॅटरिना कैफ स्वत: चा ‘हा’ चित्रपट पाहून ठोकणार होती इंडस्ट्रीला ‘राम-राम’, जाणून घ्या कसे बदलले अभिनेत्रीचे मत

कॅटरिना कैफ स्वत: चा ‘हा’ चित्रपट पाहून ठोकणार होती इंडस्ट्रीला ‘राम-राम’, जाणून घ्या कसे बदलले अभिनेत्रीचे मत

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणे पसंत करते. कामाबरोबर ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव असलेल्या कॅटरिना कैफच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तिने तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित राहून फिल्मी जग सोडण्याचा निर्णय घेतला होता. कॅटरिना कैफने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले असले तरी सुरुवातीच्या काळात तिच्या नावावर काही फ्लॉप चित्रपट आले आहेत.

‘नमस्ते लंडन’च्या स्क्रिनिंगला उपस्थित राहिल्यानंतर कॅटरिना कैफला वाटले की, हा चित्रपट फ्लॉप होणार आहे. त्यानंतर तिने फिल्मी जग सोडण्यासाठी बॅग भरली होती. करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिनेत्रीने याचा खुलासा केला होता. पण प्रदर्शित होताच या चित्रपटाने कॅटरिना कैफला चकित केले.

तिचा हा चित्रपट जबरदस्त हिट झाला आणि तिला चित्रपट जगतातील बड्या दिग्दर्शकांचे फोन येऊ लागले. या चित्रपटानंतर ती ब्युटी विथ ब्रेन म्हणून दिसली. तिला चित्रपटांच्या ऑफर्सची ओढ लागली. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कॅटरिना कैफच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले, चित्रपटातील डायलॉगपासून ते प्रत्येक गाणे खूप गाजले.

कॅटरिना कैफने ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हॉटेल सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये विकी कौशलशी (Vicky Kaushal) लग्न केले. कॅटरिना आणि विकी कौशलच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘या’ चित्रपटांमध्ये लवकरच दिसणार आहे कॅटरिना
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कॅटरिना लवकरच ‘टायगर ३’, ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘टायगर ३’ चित्रपटातील बहुतांश सीन्स शूट करण्यात आले आहेत. तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा