×

सलमान खान अन् कॅटरिना कैफ जखमी? ‘टायगर ३’च्या सेटवरून फोटो झाले लीक

सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर ३’ची शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. दरम्यान, सेटवरून या दोन स्टार्सचे फोटो लीक झाले आहेत, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सलमान-कॅटरिना अतिशय वाईट अवस्थेत पाहायला मिळाले.

सलमान आणि कॅटरिनाला झाली दुखापत
‘टायगर ३’च्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये कॅटरिना कैफ आणि सलमान खान जखमी दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर अनेक जखमा दिसत आहेत. तर सलमान खानच्या चेहऱ्यावरून रक्तही टपकताना दिसत आहे. (katrina kaif salman khan injured during tiger 3 film shooting in delhi pictures leaked)

View this post on Instagram

A post shared by Salmanics_27🇮🇳 (@salmanics_27)

स्टंटचे फोटो झाले लीक
खरं तर, हे फोटो ‘टायगर ३’च्या सेटवरील आहे, जिथे कॅटरिना आणि सलमान स्टंट करताना दिसले. या फोटोंमध्ये कॅटरिनाने कॉम्बॅट व्हेस्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे, तर सलमान खान टी-शर्टसह ट्राउजरमध्ये दिसत आहे. या दोघांना पाहून या चित्रपटात प्रेक्षकांना दमदार ऍक्शन पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे.

दिल्लीला पोहचताच शेअर केला सेल्फी
कॅटरिना कैफने दिल्लीला पोहोचताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी शेअर केला. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विंटर सन.” या फोटोमध्ये कॅटरिनाने पांढरा टी-शर्ट घातला होता आणि तिचे केस ओले होते. यामध्ये तिचा लूक खूपच किल्लर दिसत होता.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

दिल्लीत पूर्ण होणार चित्रपटाचे शेवटचे आऊटडोअर शेड्यूल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘टायगर ३’ चित्रपटाचे शेवटचे आऊटडोअर शेड्यूल दिल्लीत पूर्ण होणार आहे. ज्यामध्ये जवळपास १० ते १२ दिवस या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. बातम्यांनुसार, या बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाचे शूटिंग तुर्की, रशिया आणि ऑस्ट्रियासह अनेक देशांमध्ये झाले आहे. 

हेही वाचा :

Latest Post