Friday, July 12, 2024

जरा इकडे पाहा! कॅटरिनाला साऊथ चित्रपटात करायचे आहे काम; म्हणाली, ‘भाषा माझ्यासाठी अडथळा’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कॅफ अनेकदा तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असते. सध्या कॅटरिना तिच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रमाेशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी कॅटरिना खूपच उत्साहित आहे. चित्रपट आणि अभिनयाव्यतिरिक्त कॅटरिना सर्व मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसते. अलिकडेच कॅटरिनाने सांगितले की, तिला दक्षिणेतील चित्रपट करायला आवडेल. अभिनेत्रीने दक्षिणेत काही चित्रपट केले आहेत ज्यात तेलुगू चित्रपट ‘मल्लीस्वरी’, ‘अल्लारी पिदुगु’ आणि मल्याळम चित्रपट ‘बलराम Vs थरदास’ यांचा समावेश आहे.

भविष्यातील योजनांबद्दल माहिती देताना कॅटिरना (Katrina Kaif) म्हणाली, “जर कधी एखादी उत्तम स्क्रिप्ट असेल, ज्यामध्ये एक मजबूत पात्र असेल, तर भाषा माझ्यासाठी अडथळा ठरणार नाही. आपल्याकडे दक्षिण भारतात काम करणारे काही असामान्य दिग्दर्शक आहेत.”

कॅटरिनाने केले साऊथ चित्रपटाचे काैतुक
कॅटरिना कॅफने मणिरत्नम आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ‘पोनियिन सेल्वन: 1’ चे कौतुक केले. अभिनेत्री म्हणाली, “मणीरत्नम सरांचा ‘पोन्नियिन सेल्वन: 1’ हा उत्तम आणि ताजे उदाहरण आहे, जो एक अप्रतिम चित्रपट आहे. यात सुंदर फ्रेम्स आणि संगीत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवणे हे एका प्रतिष्ठित दिग्दर्शकाची योग्यता सिद्ध करते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाचा ‘फाेन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबरला हाेणार प्रदर्शित
विकी कौशलसोबत लग्नानंतर कॅटरिनाचा पहिला चित्रपट ‘फोन भूत’ आहे. या चित्रपटात कॅटरिना व्यतिरिक्त सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहे. एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित हाेणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कॅटरिनाने लग्नानंतर केली पहिली दिवाळी साजरी
कॅटरिना कॅफ आणि विकी कौशल सध्या बॉलिवूडच्या विविध दिवाळी पार्ट्यांमध्ये दिसत आहेत. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करताना कॅटरिना-विकी या सणाचा आनंद लुटताना दिसले. दोघेही दिवाळी पार्टीसाठी वेगवेगळे स्टाइल कॅरी करताना दिसले, जे त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘थँक गॉड’च्या बहाण्याने सिद्धार्थ ​​कियारासोबत घालवणार खास क्षण! हे मनोरंजक काम करणार आज रात्री

मलायका अरोराचा सोज्वळ अंदाज, काळ्या साडीमध्ये हटके पोज पाहिलेत का फोटो?

हे देखील वाचा