Sunday, July 14, 2024

‘थँक गॉड’च्या बहाण्याने सिद्धार्थ ​​कियारासोबत घालवणार खास क्षण! हे मनोरंजक काम करणार आज रात्री

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एकीकडे त्याच्या ‘थँक गॉड‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे ताे त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री कियारा अडवाणी सोबतच्या त्याच्या लव्ह लाईफबद्दलही प्रसिद्धी मिळवत आहे. सिद्धार्थचा ‘थँक गॉड’ चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत. या सगळ्यामध्ये आता अशी बातमी येत आहे की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिद्धार्थने कियारासोबत चित्रपट पाहण्याचा प्लॅन बनवला आहे. आज (दि. 25 ऑक्टाेबर)ला रात्री सिद्धार्थ प्रेक्षकांमध्ये जाऊन चित्रपट पाहणार आहे आणि या बहाण्याने कियारासोबत वेळ घालवणार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थ (Sidharth Malhotra) आज (दि. 25ऑक्टाेबर)ला रात्री 8 वाजता मुंबईतील एका सिनेमागृहामध्ये कियारा (kiara advani) सोबत ‘थँक गॉड’ चित्रपट पाहण्याची योजना आखत आहे. सिद्धार्थने सामान्य लोकांप्रमाणे त्यांच्यामध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांनी संपूर्ण हॉल बुक केला आहे की, नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर झाली मैत्री
सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची कॅप्टन बत्राच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ चित्रपटाच्या सेटवर मैत्री झाली होती. यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकाना डेट करत आहेत. जरी या जोडप्याने कधीही त्यांच्या अफेअरची कबुली कोणालाही दिली नाही. तरी दोघांच्या लग्नाची चर्चा साेशल मीडियावर जोरात सुरू आहे.

पुढील वर्षी एप्रिलमध्ये अडकणार लग्नबंधनात
माध्यमांतील वृत्तानुसार, हे जोडपे पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याचे लग्न अतिशय खाजगी होणार असुन हे जाेडपे सर्व प्रथम दिल्लीतील न्यायालयात काेर्ट मॅरेज करणार आहे आणि त्यानंतर ते रिसेप्शन व कॉकटेल पार्टी देणार आहेत. या दाेघांच्या लग्न साेहळ्यात कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरील कोणीही सहभागी होणार नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’

राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण

हे देखील वाचा