Saturday, April 20, 2024

केंडल जेनरच्या ब्रालेस मिरर सेल्फीने वाढवले तापमान, दोन दिवसांपूर्वी न्यूड फोटोने घातला होता धुमाकूळ

हॉलिवूडच्या टॉप मॉडेल्सपैकी एक असलेली केंडल जेनर तिच्या बोल्ड फोटो आणि हॉट स्टाईलसाठी ओळखली जाते. केंडलने मॉडेलिंगच्या जगात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि अगदी लहान वयातच ती टॉप मॉडेल्सपैकी एक बनली आहे.

केंडलने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिचे शालेय शिक्षणही पूर्ण केले नाही आणि काही वर्षांतच ती तिच्या मेहनतीने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मॉडेल्सपैकी एक आहे. त्यासह सोशल मीडिया सेन्सेशन केंडल जेनर तिच्या सुपर ग्लॅमरस फोटोंमुळे सतत चर्चेत असते. तिची ग्लॅमर इमेज अबाधित ठेवत तिने पुन्हा एकदा तिच्या ब्रॅलेस मिरर सेल्फीसह इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे. तिच्या या नवीन सेल्फीमध्य केंडल जेनरने तिच्या बोल्डनेसने इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे.

केंडलने (Kendall Jenner) अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन ब्रालेस मिरर सेल्फी पोस्ट केल्या आहेत. पहिल्या सेल्फीमध्ये ती लाल रंगाच्या सी-थ्रू टॉप आणि ब्लॅक स्कर्टमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये केंडल काळ्या सी-थ्रू टॉप आणि अनबटन शॉर्ट्समध्ये तिचा सेल्फी घेताना दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये तिने खूप बोल्ड शॉट्स दिले आहेत. केंडलची हे फोटो पाहून कोणीही क्लीन बोल्ड होईल.

काही काळापूर्वी केंडल जेनरने ब्रालेस असण्याबद्दल तिचे प्रेम व्यक्त केले होते. ती म्हणाली होती की, “मला वाटते की तुमच्या कपड्यांमागे काय आहे ते दाखवणे खूप छान आहे, मग ती क्यूट ब्रालेट असो किंवा तुमची त्वचा.” दोन दिवसांपूर्वी केंडलने बिकिनी फोटोजसोबत तिचा न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोशूटमध्ये केंडलचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता.

अलीकडे, केंडल जेनर मिलान फॅशन वीकमध्ये प्राडा फॉल/विंटर २०२२ रन अवे साठी रॅम्पवर चालताना दिसली. तिने पफर जॅकेटसह स्पार्की ग्रे स्कर्टमध्ये तिचा लूक पूर्ण केला. तेव्हा मित्र आणि चाहत्यांनी कौतुकाचे पूल बांधले होते. कोणी तिला ‘परफेक्शन’ म्हणत तर कोणी तिला खरी मॉडेल म्हणत तिला पूरक बनवले. तिच्या या पोस्टला २० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

एवढेच नाही, तर केंडलचे नाव प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरसोबतही जोडले गेले आहे. केंडल आणि जस्टिन नेहमीच एकमेकांना मित्र म्हणून संबोधतात. केंडल जेनर २००७ मध्ये सुरू झालेल्या ‘कीपिंग अप विथ द कार्दशियां’ या रियॅलिटी शोमध्येही दिसली आहे. यासोबतच २०१२ मध्ये ‘हवाई फाइव्ह-ओ’ चित्रपटाच्या एका एपिसोडमध्येही ती दिसली होती.

हेही वाचा – 

हे देखील वाचा