×

भारती सिंग देणार जुळ्या मुलांना जन्म? जोडप्याने प्रेमाने सजवली होणाऱ्या बाळाची रूम

टीव्हीची कॉमेडियन क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग खिल्ली उडवण्याच्या बाबतीत कोणालाच सोडत नाही. मग तिच्यासमोर रोहित शेट्टीसारखा दिग्दर्शक उभा असो वा कुठलाही अभिनेता. प्रसिद्ध जोडपे भारती आणि हर्ष लिंबाचिया एप्रिल २०२२ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत. अलीकडेच भारतीने तिच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांना तिच्या मुलाची रूम दाखवली. जी तिने आणि तिच्या पतीने मिळून सजवली आहे. गंमत म्हणजे व्हिडिओमध्ये ती असा इशाराही देत ​​आहे की, तिला जुळी मुले होणार आहेत. कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया सध्या ‘हुनरबाज’ हा टीव्ही शो होस्ट करत आहेत. व्हिडिओमध्ये भारतीने चाहत्यांना तिच्या बाळाच्या पाळणाघराची झलक दाखवली आहे, ज्याला पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

भारती (Bharti Singh) व्हिडिओमध्ये सांगते की, या मुलाची खोली आधी हर्षचे (Haarsh Limbachia) वर्कस्टेशन होते. ती खुलासा करते की, मिया-बीवी दोघांनी आता त्याचे रुपांतर मुलांच्या रूममध्ये केले आहे. या जोडप्याने रूमला प्रेमाने गुलाबी आणि निळ्या रंगाचा स्पर्श दिला आहे. कारण त्यांना सध्या त्यांच्या बाळाचे लिंग माहित नाही. भारतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बाळाच्या पाळणाघरात दोन रूम असल्याचे तुम्ही पाहू शकता. खिडकीवर पांढरे पडदे लटकले आहेत आणि रंगीबेरंगी कुशन असलेला मरून सोफा ठेवला आहे. या रूमला स्टडीरूम देखील अटॅच केली आहे.

व्हिडिओमध्ये हर्षने ही संपूर्ण खोली सजवल्याबद्दल आपल्या प्रेमळ पत्नीचे आभार मानले आहेत. तो म्हणाला की, “हे बार्बी डॉल्सच्या फॅन असलेल्या १२ किंवा १३ वर्षांच्या मुलीच्या खोलीसारखे दिसते.” त्यानंतर हर्षने कपाटाच्या ड्रॉवरकडे बोट दाखवले, ज्यामध्ये भारतीने काहीतरी चुकीचे केले आहे आणि रूममध्ये काहीच स्वच्छ नव्हते. याआधी, तिच्या गरोदरपणाबद्दल बोलताना भारती म्हणाली होती की, तिला एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला तिच्या पहिल्या मुलाची अपेक्षा आहे.

अमृतसरमध्ये जन्मलेल्या भारतीने मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीने तिच्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर आयुष्यात यश मिळवले आहे. प्रेक्षकांना हसवून आणि लक्झरी लाईफ जगून भारती आज करोडपती झाली आहे. एवढेच नाही, तर भारती ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडमध्ये काही मिनिटांसाठी लाखो रुपये फी घेते. भारतीने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. भारती आणि हर्ष दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले. भारती सिंग आता आई होणार आहे. भारतीने अलीकडेच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

हेही वाचा –

 

Latest Post