प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील सर्वात लाेकप्रिय जोडप्यापैकी एक आहेत. दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची पुष्टी केली नसली तरी, अनेकदा ते सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात आणि बऱ्याचदा कार्यक्रमात साेबत दिसतात. त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. अशातच, सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये या जोडप्याच्या लग्नाबद्दल जाेरदार चर्चा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कियारा-सिद्धार्थ पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत. आता त्यांच्या लग्नाबद्दल आणखी एक रंजक बातमी समोर आली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, कियार अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्हाेत्रा (Sidharth Malhotra) एप्रिल महिण्यात लग्न बंधनात अडकणार आहे. मात्र, या दाेघांचे लग्न खासगीरित्या हाेणार आहे. लग्नात कुटुंबा व्यतिरिक्त बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीचा समावेश असणार नाही.
View this post on Instagram
दिल्लीत होणार आहे लग्न
माध्यमांतील वृत्तानुसार, लग्नात फक्त कियारा आणि सिद्धार्थच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधील कोणालाही लग्नाचे आमंत्रण दिले जाणार नाही. या दोघांचे लग्न दिल्लीत होणार आहे. सर्वप्रथम कियारा-सिद्धार्थ दिल्लीतील कोर्टात रजिस्टर मॅरिज करणार आहे आणि त्यानंतर ते रिसेप्शन आणि कॉकटेल पार्टी देणार आहे. त्यांच्या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडमधील कोणकोणते लोक उपस्थित राहतील याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, एप्रिलमध्ये हे जाेडपे लग्न बंधनात अडकणार असल्याचे निश्चित आहे.
‘शेरशाह’च्या सेटवर दोघांची झाली हाेती भेट
माध्यमांतील वृत्तानुसार, कियारा-सिद्धार्थ गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समाेर आल्या हाेत्या, पण त्या सर्व अफवा ठरल्या. आता हे जोडपे लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2021 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘शेरशाह’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कियारा-सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या डेटिंगचा अंदाज लावला जात हाेता. दोघांची ऑनस्क्रीन जोडी लोकांना खूप आवडली होती.(actress kiara advani and actor sidharth malhotra will first do a registered marriage reports)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ