Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड विमानतळावर कियाराच्या टी- शर्टनेच वेधले सर्वांचे लक्ष; किंमत जाणून तुम्हीही म्हणाल, ‘एवढं महाग!’

विमानतळावर कियाराच्या टी- शर्टनेच वेधले सर्वांचे लक्ष; किंमत जाणून तुम्हीही म्हणाल, ‘एवढं महाग!’

जस जसा काळ बदलला, तस तसे फॅशनमध्येही बराच बदल झाला. याचा प्रत्यय आपल्याला बॉलिवूड कलाकारांद्वारे येतो. बॉलिवूड कलाकार आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत येतात. ते परिधान करणारे कपडे, बूट, वापरणाऱ्या आलिशान गाड्या यांबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यांच्या महागड्या कपड्यांच्या किंमतींमध्येही चाहत्यांना चांगलाच रस असतो. अशातच आता कियारा आडवाणी विमानतळावर स्पॉट झाली. यादरम्यान तिने परिधान केलेल्या टी- शर्टकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) कियारा विमानतळावर स्पॉट झाली होती. कॅज्युअल लाँग टी- शर्ट आणि पांढऱ्या शॉर्ट्समध्ये ती खूप सुंदर दिसत होती. कियाराच्या खास लूकवरही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. कारण, तिने साधासुधा नाही, तर गुच्ची ब्रँडचा टी- शर्ट घातला होता. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने दोन दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Actress Kiara Advani Arrived At The Airport Dressed In Gucci T Shirt Know The Price)

व्हिडिओमध्ये कियारा पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटसह पांढऱ्या रंगाचे शूज परिधान केलेली दिसत आहे. तपकिरी रंगाची लेदर बॅगही तिच्याकडे  दिसत आहे. अभिनेत्रीने तेथे उपस्थित असलेल्या पॅपराजींनाही निराश केले नाही आणि अनेक हटके पोझ दिल्या.

हा व्हिडिओ शेअर करत कियाराने लिहिले की, “आज कियारा शूटिंगच्या निमित्ताने हैदराबादला रवाना झाली. अलीकडेच जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, सध्या त्याची लग्नाची कोणतीही योजना नाही. त्याच्या खास चित्रपटाचे ‘प्रोडक्शन’ अद्याप झालेले नाही. प्रश्न टाळण्याचा एक स्मार्ट मार्ग! नंतर त्यांचे लग्न कधी आणि कुठे होणार हे सर्वांना कळवू असे सांगून त्यांनी चाहत्यांना दिलासा दिला.”

कियाराच्या टी- शर्टची किंमत
माध्यमांतील वृत्तांनुसार, कियाराने परिधान केलेल्या टी- शर्टची किंमत जवळपास ५२ हजार रुपये इतकी आहे. कियाराला वेस्टर्नसोबतच पारंपारिक ड्रेस परिधान करण्याची आवड आहे. साडीतही ती खूपच सुंदर दिसते.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘शेरशाह’ चित्रपटात दिसली होती, ज्यात तिच्या स्टाईलने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटात ती तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती, ज्यामध्ये त्यांच्या केमिस्ट्रीचे सर्वांनी कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

हे देखील वाचा