Friday, December 5, 2025
Home मराठी बाप रे! किशोरी शहाणे यांच्या गाडीचा मोठा अपघात, पुण्याच्या मावळमध्ये घडली घटना

बाप रे! किशोरी शहाणे यांच्या गाडीचा मोठा अपघात, पुण्याच्या मावळमध्ये घडली घटना

सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या अपघातात त्यांना काही झाले नसून, त्या सुखरूप आहेत. पुण्यातील मावळमध्ये ही घटना घडली. ज्याची माहिती स्वतः किशोरी यांनी चाहत्यांना दिली आहे. अपघाताच्या बातमीने चाहते चिंतेत पडले होते. मात्र त्या सुखरूप असल्याचे समजताच चाहत्यांच्या जीवात जीव आला असावा.

शेअर केली पोस्ट
किशोरी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून, आपल्यासोबत झालेल्या या अपघाताची माहिती चाहत्यांना दिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” (actress kishori shahane car accident near lonavala pune)

अपघाताबद्दल सविस्तर सांगायचं झालं, तर किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं, फेसबुक पोस्टमधले फोटो पाहता दिसतंय.

मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांसमोर सादर केल्या. मोठा पडदा गाजवल्यानंतर किशोरी ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय किशोरी सोशल मीडियावर सक्रिय राहून, त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा